Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्थसंकल्प फुटलेला नाही : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) :  अर्थसंकल्प ट्विटरवरून फुटल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणापूर्वी त्याबाबत एकही ट्विट झाले नाही. दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी पहिले ट्विट झाले असून अर्थसंकल्प फुटलेला नाही, असे स्पष्ट करतानाच काळाप्रमाणे डिजिटलच्या नव्या माध्यमांचा स्वीकार विरोधकांनी करावा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना ट्विटरवरुन अर्थसंकल्प फुटल्याचे सांगत विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्याचे युग डिजिटल माध्यमांचे आहे. ही माध्यमे धावत्या समालोचनासारखे अपडेट देत असतात. ‘डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतात. विरोधी पक्षांनी ही माध्यमे समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात, पण आम्ही सकारात्मक वापर करत आहेत, यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये’, असे सुनावताच विरोधकांनी पुन्हा सभागृहात यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: