Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शासकीय कर्मचार्‍याला मारहाण
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 19 : शासकीय कर्मचार्‍याला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी प्रतापसिंहनगर येथील दोन जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 18 रोजी 9. 15 वाजण्याच्या सुमारास सातारा - कोरेगाव मार्गावर क्षेत्रमाहुली येथील गुडलक बेकरी समोर अभिजित बाबुराव मगरे ( वय 32), रा. एम. एस. ई. बी. वसाहत, गोडोली हे शासकीय कर्मचारी ट्रान्सफार्मरचा फ्युज टाकत असताना दि. 13 रोजी साईट देण्याच्या कारणावरून ट्रक चालक दत्तात्रय जालंदर कडाळे, रा. प्रतापसिंह नगर, खेड त्याच्याशी झालेल्या शाब्दिक वादावादीचा राग मनात धरून अभिजित मगरे हे शासकीय काम करत असताना  दत्तात्रय कडाळे आणि सुरज बाळू गायकवाड, दोघेही राहणार प्रतापसिंह नगर यांनी दत्तात्रय मगरे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: