Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मिक्सरच्या पात्यात अडकून एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 19 : सिमेंटच्या मिक्सरच्या पात्यात अडकून एक कामगार गंभीर जखमी होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बी. नरसिमलू (वय 28) मूळ राहणार पोतनपल्ली, मेहबूब नगर, तेलंगणा, सध्या राहणार निढळ, ता. खटाव हा मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा कर्मचारी मंगळवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास निढळ गावच्या हद्दीत सातारा - पंढरपूर रस्त्याचे काम करत असताना रस्त्यासाठी लागणारे सिमेंट सिमेंटच्या मिक्सरमधून काढत असताना अचानक ऑपरेटरने मिक्सर सुरू केल्यामुळे आतील मिक्सरच्या पात्यात अडकून पडून गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: