Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सगळं समसमान मिळावं
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) :  आपल्यात सगळं समसमान असलं पाहिजे’, असं सूचक वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तेत शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष समान वाटेकरी असायला हवेत, अशी मागणी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांपुढे रेटली आहे.
किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेना वर्धापनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणानंतर उद्धव यांचे भाषण झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी युती भक्कम असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. ‘ज्या एका भावनेतून पूर्वी युती झाली होती, त्याच भावनेने पुन्हा युती झाली आहे’, असे उद्धव म्हणाले.
‘एका युतीची पुढची गोष्ट’ आता सुरू करू, असे आवाहन करत ‘तुटणार नाही, फुटणार नाही.   
हाती घेतलेला हिंदुत्वाचा वसा प्राण गेला तरी सोडणार नाही’, अशी शपथही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिली.
आमचं पण आता ठरलंय! शिवसेना-भाजपमधील वाद आता संपला आहे, असे नमूद करत संजयकाका पाटलांच्या कोल्हापुरातल्या सभेतील वाक्याचा उद्धव ठाकरे यांनी दाखला दिला. ‘आमचं ठरलंय’ असं तिथे सगळे म्हणायचे त्याप्रमाणेच ‘आता आमचं पण ठरलंय’ अशी कोटी करत उद्धव ठाकरे यांनी युती एकदिलाने वाटचाल करणार, असे संकेत दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: