Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा न्यायालय परिसरातून दुचाकी लंपास
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 19 : दि. 18 रोजी येथील न्यायालय परिसरात असणार्‍या सातारा - कोरेगाव मार्गाकडेला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विठ्ठल मारुती सावंत, रा. वेणेगाव, ता. सातारा यांच्या चुलत्यांच्या नावे असलेली दुचाकी क्रमांक (एम.एच. 11 बीटी 9604) ही दि. 18 रोजी येथील न्यायालय परिसरात असणार्‍या सातारा - कोरेगाव मार्गाकडेला लावली होती. ती सकाळी 10 ते 11. 30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: