Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जम्मू-काश्मीरचे विधेयक मांडताना मनात भीती होती
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: mn1
5चेन्नई, दि. 11 (वृत्तसंस्था) : अनुच्छेद 370 हटवल्यावर काश्मीरमध्ये त्याचे काय परिणाम होतील, याबाबत केंद्रीय गृहमंत्री म्हणून माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. काश्मीरच्या विकासाला चालनाच मिळेल, असा मला ठाम विश्‍वास होता. मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीरचे विधेयक राज्यसभेत सादर करताना माझ्या मनात भीती होती म्हणूनच आम्ही लोकसभेऐवजी आधी राज्यसभेतच हे विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला होता, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
चेन्नई येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी ही कबुली दिली. राज्यसभेत आमचे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे आम्ही आधी राज्यसभेतच हे विधेयक सादर करण्याचा आणि नंतर लोकसभेत विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. आंध्रप्रदेशाच्या विभाजनाच्या वेळचे दृश्य माझ्या समोर होते. त्यामुळे काश्मीरबाबत निर्णय घेतल्यावर मी सुद्धा या दृश्याचा एक भागीदार तर नाही ना होणार? अशी शंका माझ्या मनात येऊन गेली होती. ही शंका आणि भीती मनात घेऊनच मी राज्यसभेत उभा राहिलो. मात्र व्यंकय्या नायडू यांनी अतिशय कुशलतापूर्वक सभागृहातील परिस्थिती हाताळली आणि पुढचे काम सोपे झाले, असे नायडू म्हणाले. दरम्यान, अनुच्छेद 370 हटविल्याने दहशतवाद संपुष्टात येऊन जम्मू-काश्मीरमध्ये विकासाला चालना मिळेल, असे सांगतानाच या आधीच 370 कलम हटवायला हवे होते. या विधेयकाचा जम्मू-काश्मीरला काहीच फायदा झाला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: