Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेस नेते ‘मायलेकाचे गुलाम’ : मालवीय
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: na3
5नवी  दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्षाने हंगामी अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड केल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री गांधी यांच्या निवडीची घोषणा करताच भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सात सेकंदांच्या या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
एका हिंदी चित्रपटातल्या दृश्याचा हा व्हिडिओ आहे. या ट्विटवर मालवीय यांनी ‘काँग्रेससाठी प्रेमपूर्वक...’ असे म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: