Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शालेय पोषण आहाराची विक्री करताना तिघांना अटक; दोघे फरार
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 : वडूज, ता.खटाव येथील हायस्कूलमध्ये 75 हजार 554 रुपयांच्या शासकीय शालेय पोषण आहाराची विक्री करताना आढळल्याने दोन शिपायांसह दुकानचालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, प्राचायार्र्ंसह छोटा हत्ती टेम्पो चालक फरार झाले आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 10 रोजी 10.30 वाजण्याच्या सुमारास वडूज, ता. खटाव येथील हुतात्मा परशुराम विद्यालयाचे प्राचार्य अविनाश काळे, शिपाई रोहित सुनील मदने (वय 27), विकास भीमराव काळे (वय 23) हे तीन जण दुकान मालक प्रल्हाद बापू निकम (वय 27), सर्व राहणार वडूज, ता. खटाव याला 75 हजार 554 रुपयांचे शासकीय शालेय पोषण आहारामधील तांदूळ व हरभर्‍याची विक्री करताना पोलिसांना आढळून आले. जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 चे उल्लंघन आणि प्रामाणिकपणे अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी रोहित सुनील मदने, विकास भीमराव काळे, दुकानमालक प्रल्हाद बापू निकम या तिघांना अटक केली. दरम्यान प्राचार्य अविनाश काळे यांच्यासह छोटा हत्ती टेम्पो क्रमांक (एम.एच. 10- एक्यू- 3571) वरील चालक अजय बबन पाटोळे हे दोघे फरार झाले. या घटनेची फिर्याद गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण महादेव पिसे (वय 47), रा. बिदाल, ता. माण यांनी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस हवलदार वायदंडे करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: