Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘चांद्रयान 2’ दि. 20 रोजी चंद्राच्या कक्षेत पोहचणार
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: mn3
5अहमदाबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : ‘चांद्रयान 2’ वेगाने चंद्राच्या दिशेने कूच करत असून 20 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत पोहचेल आणि त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्रावर उतरेल, अशी माहिती ‘इस्रो’ प्रमुख डॉ. के. सिवन यांनी आज दिली. चांद्रयान पुढच्या दोन दिवसात पृथ्वीची कक्षा सोडेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक आणि ‘इस्रो’चे संस्थापक दिवंगत डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे आयोजित कार्यक्रमाला सिवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘चांद्रयान 2’च्या मार्गक्रमणाबद्दल माहिती दिली. 22 जुलै रोजी ‘चांद्रयान 2’चे यशस्वी प्रक्षेपण झाले.   
या यानाचा प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू असून सध्या हे यान पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहे. आता बुधवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी
पुढचे पाऊल उचलले जाईल म्हणजेच ‘ट्रान्स-लुनार-इंजेक्शन’ दिले जाईल. त्यामुळे ‘चांद्रयान-2’ पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. साधारण 20 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या
कक्षेत प्रवेश करेल आणि 7 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरेल, असे त्यांनी सांगितले. चांद्रयानचा आजवरचा प्रवास सुरळीतपणे सुरू आहे. त्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: