Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मलकापूर येथे 7 लाखांचा गुटखा जप्त
ऐक्य समूह
Wednesday, September 04, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: lo1
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
5सातारा, दि. 3 : मलकापूर, ता. कराड येथे स्थानिक गुन्हे शाखेने 6 लाख 80 हजार 200 रुपयांचा गुटखा हस्तगत केला.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने कराड शहरात कार्यरत असलेले स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पथक कराड शहरात पेट्रोलिंग व गुन्हेगारावर लक्ष ठेवून असताना दि. 2 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना खास बातमीदाराकडून माहिती मिळाली, की कराड येथून कोल्हापूरकडे जाणार्‍या रोडवर टेम्पो (क्रमांक एम. एच. 11- 2024) मधून विक्रीस बंदी असलेल्या तंबाखूजन्य सुगंधी गुटख्याची वाहतूक करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने विजय कुंभार यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाला सूचना देऊन रिलायन्स पेट्रोल पंप, मलकापूर, ता. कराड येथे सेवारस्त्यावर सापळा लावण्यात सांगितला. सापळा लावला असता सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित वर्णनाचा व क्रमांकाचा टेम्पो कराड येथून कोल्हापूरकडे जात असताना दिसून आला.  
तो थांबून आतील अय्याज इमामुद्दिन सिद्दिकी (वय 43), इमरान पटवेकर, दोघेही राहणार अकबर मोहल्ला, इस्लामपूर, ता. वाळवा यांच्यासमक्ष टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये झटपट रॉयल क्लास नावाचे गुटख्याचे बॉक्स आढळून आले. त्यांच्याकडून 7 लाख 80 हजार 200 रुपयांचा गुटखा हस्तगत केला. संबंधित मुद्देमाल अन्न व सुरक्षा अधिकारी यांच्या ताब्यात दिल्यानंतर रोहन राजकुमार शहा यांनी त्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: