Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोणंदच्या पोलीस कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, September 05, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: re2
5लोेणंद, दि. 4 : सातारारोडवर  कोपर्डे, ता. खंडाळा गावच्या बसस्थानकाजवळ रात्री 12 ते 1 वाजण्याच्या  सुमारास  लोणंद पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस असलेले पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (रा. लोणंद पोलीस वसाहत) यांचा  दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला.
 लोणंद पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पो. ना. अतुल गायकवाड रात्री उशिरा लोणंद कडे येत असताना कोपर्डे गावचे हद्दीत बस स्टँड जवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद असल्याने अपघाताची माहिती लवकर समजली नाही. त्यामुळे अपघातानंतर त्यांच्या डोक्याला व पायाला मोठी दुखापत होऊन, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती एका वाहन चालकाने दिल्यानंतर त्वरित  सपोनि. संतोष चौधरी  यांनी पोलीस स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,  कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांनी घटनास्थळी भेट दिली. अतुल गायकवाड यांना दोन लहान मुली आहेत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूने लोणंद शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: