Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे साडे चार फुटांवर
ऐक्य समूह
Saturday, September 07, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re2
कोयना धरणात 103.30 पाणीसाठा
5पाटण, दि. 6 :  कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणाचे 8 फुटांवर असणारे दरवाजे शुक्रवारी सकाळी 11 वाजता साडेचार फुटांवर ठेवण्यात आले आहेत. कोयना धरणाच्या  दरवाजातून विनावापर 39 हजार 414 व पायथा वीजगृहातून 2 हजार 100 असे एकूण 41 हजार 514 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. शिवाजीसागर जलाशयात प्रतिसेकंद 61 हजार 576 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.  
कोयना धरणात सध्या  103.30 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाने दिली.
शुक्रवारी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 42 (6235), नवजा 44 (7170), महाबळेश्‍वर 33 (6301) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रात प्रतापगड 37 (5853), सोनाट 27 (5229), वळवण 46 (6946) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातील जलपातळी 2162 फूट 00 इंच, 658.978 मीटर व पाणीसाठा 103.30  टीएमसी एवढा झाला आहे. जलाशयात 61 हजार 576 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून 41 हजार 514 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: