Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पानसरे हत्याप्रकरणी तिघांना पहाटे अटक
ऐक्य समूह
Saturday, September 07, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: re1
5कोल्हापूर, दि. 6 (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकर्‍यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे.
अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकर्‍यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: