Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची निवड
ऐक्य समूह
Saturday, September 07, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn3
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची वर्णी लावण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे त्यामुळे काँग्रेस हायकमांडने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली होती. तर मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्तच होते. अखेर आज हे पद भरण्यात आले आहे. राज्यात गणेश विसर्जनानंतर विधानसभा निवडणुका लागण्याची चिन्हे आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: