Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शंभर दिवस विकास, विश्‍वास व परिवर्तनाचे
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील शंभर दिवस पूर्ण झाले. ट्रिपल तलाकपासून अनुच्छेद 370 पर्यंत अनेक धाडसी आणि धडाकेबाज निर्णय मोदी सरकारने घेतले. सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत हे 100 दिवस विकासाचे, विश्‍वासाचे आणि देशात मोठ्या परिवर्तनाचे होते. हे 100 दिवस निर्णयाचे, निष्ठेचे आणि नेक नियतीचे होते. हे 100 दिवस जन संकल्पाचे, जन सिद्धीचे आणि जनहित सुधारण्याचे होते, असे म्हटले आहेे.
लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही जेव्हा लोकांसमोर गेलो तेव्हा काही संकल्प केले होते. यातले काही संकल्प पूर्ण झाल्यामुळे मला आनंद झाला आहे, तर यातले काही संकल्प लवकरच पूर्ण होतील, असे दुसरे ट्विट त्यांनी केले आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. शिवाय येत्या काळात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठ्याचा संकल्पही सरकारने केले आहे. या 100 दिवसांमध्ये मोदी सरकारने ट्रिपल तलाक कायदा मंजूर केला, शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजारांची मदत जाहीर केली, 
अनुच्छेद 370 रद्द केला, 150 भ्रष्ट अधिकार्‍यांना घरी पाठवले, बिनकामाचे 58 कायदे रद्द केले व राष्ट्रीयकृत बँकांचे
विलिनीकरण केले.
 100 दिवस, विकास नाही : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसर्‍या टर्मचे 100 दिवस पूर्ण केले आहेत. मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधताना कोणतीही विकासकामे न करता 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल मोदी सरकारला शुभेच्छा. त्यांनी पुढे म्हटले आहे, की 100 दिवस कोणतीही विकासकामे न करता (100ऊरूीछेतळज्ञरी), सतत लोकशाहीवर हल्ला करण्यासाठी, टीकाकार मीडियाचा गळा घोटण्यासाठी मोदी सरकारला शुभेच्छा. स्पष्ट नेतृत्त्वाची कमी, आर्थिक विकासाचा
मंदावलेला वेग अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी सरकारकडे योग्य दिशा आणि उपाययोजनांची कमी आहे. सरकारवर टीका करताना काँग्रेसने हुकूमशाही, अनागोंदी आणि अराजकता या तीन शब्दांचा वापर केला आहे. आठ क्षेत्रांमध्ये दोन टक्क्यांपेक्षा कमी विकासदराची नोंद झाली आहे. मात्र एकीकडे आमचे अर्थमंत्री अद्यापही ही गोष्ट मान्य करण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे आमची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. समस्या सोडवायच्या असतील तर त्या आधी शोधणे गरजेचे असते, मात्र सरकार यामध्ये अपयशी ठरले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: