Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेस उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु आहे. काँग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना तर गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले 70 उमेदवार निश्‍चित केल्याचे समोर येत आहे. काल पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावे निश्‍चित झाल्याचे समजते. शिवसेना-भाजप युतीचीही घोषणा येत्या दोन-चार दिवसात होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्या-बाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार असल्याचे बोलले जात आहे. 
काँग्रेसचे पहिल्या यादीतील संभाव्य उमेदवार
विश्‍वजित कदम (पलूस-कडेगाव), पृथ्वीराज चव्हाण (कराड), अशोक चव्हाण (भोकर), प्रणिती शिंदे (सोलापूर), अमित देशमुख (लातूर शहर), बाळासाहेब थोरात (संगमनेर), यशोमती ठाकूर (तिवसा), नितीन राऊत (नागपूर उत्तर), मुजफ्फर हुसेन (मीरा भाईंदर), पी. एन. पाटील (करवीर), पद्माकर वळवी (शहादा), शिरीष नाईक (नवापूर), ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), संजय जगताप (पुरंदर), रमेश बागवे (पुणे कंटोन्मेंट), कल्याण काळे (फुलंब्री), अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), नसीम खान (चांदीवली), भाई जगताप (कुलाबा), कुणाल पाटील (धुळे) व विजय वडेट्टीवार (ब्रम्हापुरी).

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: