Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेकॉर्डब्रेक 35 निर्णय !
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: mn2
पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 35 निर्णय घेण्यात आले. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत 25 निर्णय घेण्यात आले होते.
अनंत चतुर्दशीनंतर कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला आहे. अनेक दिवस तुंबलेले निर्णय मार्गी लागत आहेत. आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 35 निर्णय घेण्यात आले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटर ग्रीडसाठी 3122 कोटींच्या निविदा काढण्याचा, सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्‍वर अध्यासन केंद्र देखील स्थापन करण्याचा तसेच सावकारांनी त्यांच्या परवाना क्षेत्राबाहेर दिलेले शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटर ग्रीडच्या 3122 कोटींच्या कामांना मंजुरी !
औरंगाबाद, जालना व बीड नंतर कायम दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांमधील प्रस्तावित वॉटर ग्रीडच्या 3 हजार 122 कोटींच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी हायब्रीड न्युटी तत्त्वावर या कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत वॉटर ग्रीड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  
या योजनेसाठी पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी
गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार इस्त्रायल शासनाच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायझेस कंपनी- सोबत करार करण्यात आला. या करारानुसार सर्व अहवाल फेब्रुवारी
2020 पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. या अंतर्गत
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पहिला व दुसरा प्राथमिक संकलन अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात लातूर जिल्ह्यासाठी 111.28 कि.मी. एमएस पाइप तर 495.85 कि.मी. डीआय पाइपलाइन अशी एकूण 607.13 कि.मी. पाइपलाइन प्रस्तावित आहे.
तसेच उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 37.92 कि.मी. एमएस पाइप तर 665.75 कि.मी. डीआय पाइपलाइन, अशी एकूण
703.67 कि.मी. पाइपलाइन प्रस्तावित आहे. लातूर जिल्ह्यासाठी 1712.91 कोटी आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1409.57 कोटी अशी एकूण 3 हजार 122 कोटी 18 लाख किंमत प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी हायब्रिड न्युटी मॉडेलवर निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणे अपेक्षित असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणे प्रस्तावित आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: