Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. उदयनराजेंचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत आज पुण्यात प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय होणार होता. परंतु ही बैठक रद्द झाल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आता याबाबत मुंबईमध्येच काय तो निर्णय होवू शकतो.
उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांनी भाजपमध्ये जाऊ नये. पक्ष संघर्षातून वाटचाल करत असताना पक्ष सोडण्याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करू नये, अशी विनंती केली होती. विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणे महत्त्वाचे होते. त्याची अडचण असल्याने सर्वांचा विचार घेऊन उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात आपल्या निवडक समर्थकांशी बोलून आत्ताच भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. उदयनराजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून दिसणार आहेत.
चंद्रकांत पाटलांमुळे भाजप प्रवेश लांबणीवर?
ना. चंद्रकात पाटील यांनी यापूर्वी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत वक्तव्ये केली आहेत. उदयनराजे जर भाजपमध्ये आले तर चंद्रकांत पाटील यांचे भाजपमधील वर्चस्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदयनराजे तरुणांचे आयडॉल आहेत. तरुणांमध्ये त्यांच्याविषयी एक वेगळी क्रेझ आहे. त्यांच्या नावामागे ग्लॅमर असल्याने त्याचा परिणाम चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील स्थानावर होणार आहे. पक्षातील त्यांचे स्थान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच उदयनराजे यांचा प्रवेश लांबणीवर पडला असल्याचे सांगितले जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: