Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : दोन विविध घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सातारा तालुक्यात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की भगवान दत्तात्रय कदम (वय 48), रा. वाढे, ता. सातारा यांचा वाढे येथे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अन्य एका घटनेत बापुराव धोंडिबा निगडे (वय 60), रा. खावली, ता. सातारा यांचा संगम माहुली येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: