Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दत्ता जाधव व त्याच्या भावाच्या विरोधात 3 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार
ऐक्य समूह
Tuesday, September 24, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 23 : प्रतापसिंहनगर, खेड (सातारा) येथील दत्तात्रय रामचंद्र जाधव, युवराज रामचंद्र जाधव यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची  आणि जीवाची भीती घालून 3 लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार अनिल महालिंग कस्तुरे (वय 37), रा. करंजे पेठ, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 17-10- 2016 च्या एक महिन्यानंतर आणि दि. 21-9-2019 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वेळोवेळी शिंदे बिल्डरच्या केसचा वकील व कारागृहात जो खर्च झाला, तो मी केला. त्याचे 3 लाख रुपये असे दत्तात्रय रामचंद्र जाधव म्हणाला असता माझ्या केसचा खर्च माझ्या पत्नीने केला. मी पैसे देऊ शकत नाही, असे मी सांगितल्यानंतर दत्तात्रय जाधव याचा भाऊ युवराज रामचंद्र जाधव, रा. प्रतापसिंह नगर, खेड (सातारा) याने वेळोवेळी तसेच मी व माझा मित्र राजेश कांबळे यांची स्विफ्ट क्रमांक ( एम. एच.11- सीयु- 3773) मधून कोरेगावला जात असताना कृष्णानगर येथील पाटबंधारे ऑफिस समोर युवराज जाधव यांनी हात करून, गाडी थांबून, मला उतरवून 3 लाख रुपये खंडणीची मागणी करत दमदाटी केली. युवराज जाधव याचा भाऊ दत्तात्रय जाधव याने युवराज जाधव याच्यामार्फत चिठ्ठी पाठवून दमदाटी करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व जीवाची भीती घालून 3 लाख रुपये खंडणी मागितल्याची फिर्याद अनिल महालिंग कस्तुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: