Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आधार-पॅन लिंक न केल्यास निष्क्रिय होणार
ऐक्य समूह
Thursday, September 26, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 25 (वृत्तसंस्था) :  पॅन आणि आधार क्रमांक 30 सप्टेंबरपर्यंत लिंक केला नाही तर 1 ऑक्टोबरपासून तुमचे पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होईल. यापूर्वी पॅन क्रमांक मुदत दिलेल्या तारखेपर्यंत आधार क्रमांकाशी लिंक केले नाही तर ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाईल, असा नियम होता.
पॅनकार्ड इनव्हॅलिड (अमान्य) म्हणजेच तुमच्याकडे पॅनकार्ड नाही, असे मानले जाते तर इन-ऑपरेटिव्ह  म्हणजेच जोपर्यंत तुम्ही पॅनकार्ड आधारशी लिंक करत नाहीत,
तोपर्यंत ते वापरता येणार नाही. मात्र, सरकारने इन-ऑपरेटिव्ह, म्हणजे नक्की काय कार्यवाही होईल, याबाबत अधिकृत माहिती
दिलेली नाही. पॅनकार्ड दिलेल्या मुदतीत आधारशी लिंक केले नाही तर ते अमान्य असेल. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमात बदल करण्यात आले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 31 मार्च 2019 रोजी पॅन आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. पॅन-आधार लिंक करण्यासंबंधीचा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. पॅन-आधार क्रमांक दिलेल्या मुदतीत लिंक केला नाही तर पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह मानले जाईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: