Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून 32 उमेदवारांची यादी जाहीर
ऐक्य समूह
Monday, September 30, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: na5
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांमध्ये होणार असलेल्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. आज (रविवार) भाजपकडून 32 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, छत्तीसगड, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि तेलंगणा या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच केरळ-5, आसाम-4, पंजाब-2, हिमाचल प्रदेश-2, सिक्कीम-2, बिहार-1, छत्तीसगड-1, मध्यप्रदेश-1, मेघालय-1, ओदिशा-1,  राजस्थान -1, तेलंगणा-1 या जागांचा यादीत समावेश आहे. 17 राज्यांमधील विधानसभेच्या 64 जागांसाठी 21 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: