Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोलेरोच्या अपघातात दोन ठार, 8 जखमी
ऐक्य समूह
Tuesday, October 01, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 30 ः पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली, ता. कराड गावच्या हद्दीत कराडहून पुण्याकडे खासगी प्रवासी घेऊन निघालेल्या बोलेरो जीपचा अ‍ॅक्सल तुटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी ठार तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, दि. 30 रोजी सकाळी 7.15 च्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रोहित लालासाहेब सूर्यवंशी (रा. वांगी, ता. कडेगाव) यांनी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बोलेरो चालक दादासाहेब शिवाजी बारागोळे (रा. मुलूंड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
शंकर पोपट जगताप (वय 30 वर्षे),  रा. वडगाव हवेली, ता. कराड, तेजस्विनी विठ्ठल पाटील (वय 27 वर्षे), रा. कापुसखेड, ता. वाळवा, जि. सांगली यांचा मृत्यू झाला आहे. तर निखील बाबासाहेब वीर (रा. तुळसण), वेदांत प्रीतम यादव (रा. कराड),  अमोल श्रीरंग यादव (रा. येरवळे), महावीर गोपाळ टारे (रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), भारत सुदाम कांबळे (रा. विश्रामबाग, सांगली), सोनाली अमित गिरीगोसावी (रा. मालखेड), विनय
भानुदास माळी (रा. काले) अशी अपघातातील गंभीर जखमींची
नावे आहेत.
याबाबत तळबीड पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवार, दि. 30 रोजी आशियाई महामार्गावरुन कराडहून बोलेरो जीप 12 प्रवासी भरुन पुण्याकडे निघाली होती. सदरची जीप सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली येथे पोहोचली असता त्यादरम्यान बोलेरोचा मागील टायरचा अ‍ॅक्सेल तुटल्याने जीप सुमारे दोन ते तीन कोलांट्या घेवून सेवा रस्त्याकडेला असणार्‍या हॉटेल उमा महेशच्या बोर्डवर धडकली. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइनचे कर्मचारी व तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जीपमधून बाहेर काढून उपचारासाठी कराड येथील खासगी रूग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बाकी आठ प्रवाशांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. तपास सपोनि जयश्री पाटील करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: