Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आचारसंहिता कालावधीत 43 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त : दिलीप शिंदे
ऐक्य समूह
Saturday, October 05, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारू, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरूपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
शिंदे यांनी सांगितले, की भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त  रुपयांचा मुद्देमाल जप्त : दिलीप शिंदे
करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: