Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार
ऐक्य समूह
Monday, October 07, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 ः शुक्रवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तर शनिवारी अर्जाची छाननी पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात 108 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. किती उमेदवार आपले अर्ज माघारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्यासाठी केवळ सोमवारी 7 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतच मुदत मिळणार आहे. या वेळेत अर्ज मागे न घेतल्यास शिल्लक अर्ज अंतिम होणार आहेत. ते उमेदवार थेट निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेेत. हे आज स्पष्ट होणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: