Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधी रविवारी महाराष्ट्रात
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रचाराचा नारळ फुटला असताना काँग्रेसच्या प्रचारासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी येणार की नाही, याबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र अखेर या चर्चांना फुलस्टॉप देत राहुल गांधी 13 रोजी महाराष्ट्रात येणार आहेत.
या दौर्‍यात राहुल गांधी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील. यावेळी मुंबईत काँग्रेसची सभा होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही याच दिवशी अर्थात 13 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौरा करणार आहेत. विदर्भातल्या जळगाव साकोली भागात मोदी आपल्या प्रचार सभा घेणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून  स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा आदींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात रंगत येणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: