Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ठोसेघर धबधब्यात अडकलेले युवक बचावले
ऐक्य समूह
Thursday, October 10, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: re3
5परळी, दि. 9 :  ठोसेघरच्या धबधब्यात अडकलेल्या दोन विद्यार्थांना ट्रेकर्सच्या मदतीने मध्यरात्री बाहेर काढण्यात आले.
 इंजिनियरिंग क्षेत्राशी निगडित असलेले निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चार विद्यार्थी सकाळी ठोसेघर फिरण्यासाठी आले होते. हे विद्यार्थी ठोसेघरच्या वरून धबधबा न पहाता त्यांनी ठोसेघर जवळील पायवाटेने दरीच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात केली. एका मध्यावर गेल्यावर त्यांना लक्षात आले, की आपण ज्या पद्धतीने खाली उतरत आहे त्या पद्धतीने आपण वरती जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी दुपारी पुन्हा वरती येण्याचा निर्णय घेतला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. डोंगरावरील ओले गवत आणि पावसाचा जोर वाढत गेल्यावर या चौघांनाही वरती येता येत नव्हते. अंधार पडल्यावर तर त्यांना डोंगरातील पायवाटाही दिसेनाशा झाल्या.  त्यातील दोन युवक कसे बसे वर आले आणि त्यांनी फोन वरून ट्रेकर्सशी संपर्क साधून मदत मागवली. रात्री 10.30 वाजता राहुल तपासे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स टिमने या मुलांची शोधमोहीम सुरू केली. रात्री 1 वाजता निहार श्रोत्री, अक्षय देशमुख ही मुले दरीत आढळून आली. प्रथम त्यांना पाणी, ग्लुकोन आणि खाण्यासाठी साहित्य दिले. या दोन्ही मुलांना ट्रेकर्सनी पहाटे 3 वाजता ठोसेघरच्या धबधब्यातून वरती काढले.
या मोहिमेत राहुल तपासे, शर्मा, चंद्रसेन पवार, अविनाश पवार, दिग्विजय पवार आणि इतर सहकारी ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्यांचे अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: