Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1 लाख 80 हजाराचा ऐवज हस्तगत
ऐक्य समूह
Friday, October 11, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 : येथील सदरबझार हद्दीत असणार्‍या लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 9 रोजी 2.50 वाजता लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीमधील पाण्याच्या टाकीखाली जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता बबन पांडुरंग थोरात (वय 28), रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा, लक्ष्मण दत्तू माने (वय 38), रा. लिंब, ता. सातारा, दिलीप दत्तू पवार ( वय 38), रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव, विनोद विठ्ठल माने (वय 36), रा. गोडोली, ता. सातारा, अजित बाळू माने (वय 36), रा. सदरबाझर, सातारा, अण्णा लाला माने (वय 40), रा. पाटखळ, ता. सातारा हे सहा जण जुगार खेळताना आढळून आले.  त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रुपयांच्या साहित्यासह 2 दुचाकी, 4 मोबाइल हस्तगत करण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: