Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जावयाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Friday, October 11, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: lo2
सातार्‍यातील घटना : सासर्‍यासह मेव्हण्यावर गुन्हा
5सातारा, दि. 10 : भाचेजावयाशी असलेल्या वादातून त्याच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार सुमित सुरेश तपासे (वय 30), रा. मल्हारपेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरा असलेल्या मामासह त्यांच्या मुलावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमित सुरेश तपासे यांचे लग्न त्यांचा मामा मच्छिंद्रनाथ प्रल्हाद शिंदे यांच्या मुलीशी 2014 मध्ये झाले आहे.  
 मात्र, पत्नीने त्यांच्यावर शारीरिक, मानसिक छळ केल्या
प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांची निर्दोष मुक्तताही झाली. त्यामुळे ते पुन्हा पत्नीसह रहात असताना पत्नीने
पुन्हा तपासे यांच्यावर त्यांच्या आईवडिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यातूनच दोन्ही कुटुंबात मतभेद सुरू असल्याने त्या रागातून दि. 9 रोजी दुपारी हॉटेल राधिका पॅलेससमोर सासरे मच्छिंद्रनाथ शिंदे व मेव्हणा सुशांत मच्छिंद्रनाथ शिंदे यांनी तपासे यांच्याकडे खुन्नसने पहात ते पेट्रोलपंपाच्या दिशेने चालत असताना त्यांच्या अंगावर हुंडाई कार घालत धडक दिली. त्यामुळे तपासे बोनेटवर पडले. ही कार मेव्हणा सुशांत चालवत होता व त्यात सासर्‍यासह एक महिलाही गाडीत होती. तपासे उठून उभे राहिल्यानंतर पुन्हा त्यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने गाडी घातली. त्यांनी उडी मारल्याने ते वाचले. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. 10 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत सासरे मच्छिंद्रनाथ तपासे, मेव्हणा सुशांत व एका अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: