Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 29
वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेल्या ‘नटसम्र्राट’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडवला. एक काळ मराठी रंगभूमीवर आणि प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणार्‍या अप्पासाहेब बेलवलकर या नटसम्राटाच्या जीवनाच्या उत्तरार्धात झालेली शोकांतिका, हे या नाटकाचे कथासूत्र. रंगभूमीवरून निवृत्त झाल्यावर नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर आपला राहता बंगला, पैसा अडका हे सारे काही आपल्या लाडक्या (!) मुला- मुलीला बक्षीसपत्राद्वारे देऊन टाकतात. पण,  या लाडक्या मुलाकडून होणार्‍या अपमानास्पद वागणुकीने स्वाभिमानी अप्पासाहेब बेलवलकर पत्नी कावेरीसह आपलेच घर सोडतात. त्यांची विवाहित मुलगी त्यांना आश्रय देते. पण, आपल्या बंगल्यातल्या नोकरांच्या खोल्यात ठेवते. मुलीनेच पैसे चोरल्याच्या केलेल्या आरोपाने व्यथित झालेले बेलवलकर मुलीचेही घर सोडून आपल्या गावी जायचे ठरवतात. पण, त्या घरात पोहोचायच्या आधीच त्यांच्या पत्नीचेही निधन होते. कफल्लक अप्पासाहेब बेलवलकर पूर्णपणे निराधार-निराश्रित होतात. त्यांच्या जीवनाची वृद्धावस्थेत फरपट होते. मुंबईतल्या फूटपाथवर बूटपॉलिश करून पोटाची खळगी भरणारा मुलगा त्यांना आश्रय देतो. सांभाळतो.
Friday, August 11, 2017 AT 09:12 PM (IST)
एकदा एक माणूस अरण्यात भटकत होता. अतिशय थकल्याने तो एका घनदाट वृक्षाखाली बसला. योगायोगाने तो कल्पवृक्ष होता. तहानेने व्याकूळ झाल्याने त्याच्या मनात आले, या अरण्यात पाणी मिळेल काय असा विचार करीत असतानाच त्याच्या पुढ्यात जलकुंभ येऊन थांबला. आश्‍चर्यचकित होऊन पाणी पिऊन त्याने तहान शमविली. काही वेळाने भूक लागल्याने त्याने उत्तम भोजनाची इच्छा केली असता विविध पदार्थांनी व पक्वान्नांनी भरलेले भोजनाचे ताट त्याच्या पुढ्यात आले. भोजन करून तो तृप्त झाला. भोजनानंतर वामकुक्षी घ्यावी असा विचार करताच एक सुंदर शय्या तेथे स्थापित झाली व तो त्यावर सुखनैव विश्रांती घेऊ लागला. झोपून उठल्यावर त्याने पाहिले, की सूर्यकिरणे संधिकाळात पसरली होती. त्याने विचार केला, आता तर संध्याकाळ झाली. या वनात राहाणे आता युक्त नाही, एखादा हिंस्र प्राणी किंवा सिंह येऊन मला खाऊन तर टाकणार नाही ना असा त्याने विचार करताच एका सिंहाने येऊन त्याच्यावर झडप घालून त्यास खाऊन टाकले. कथा उपदेश : आपले मनच कल्पवृक्षाप्रमाणे असते. जशी इच्छा तशी फळे!
Thursday, August 03, 2017 AT 08:53 PM (IST)
गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात  प्रचंड क्रांती झाली. सारे जग जवळ आले. साता समुद्रापार असलेल्या आपल्या मित्र, परिवाराशी क्षणार्धात संपर्क साधणे, संवाद साधणे शक्य झाले. साध्या मोबाईलचा औत्सुक्याचा जमानाही गेला आणि आता स्मार्टफोनचे नवे संपर्क साधन सहज उपलब्ध झाले. स्मार्टफोनद्वारे जगातल्या माहितीचा, मनोरंजनाचा खजिनाच सामान्यांनाही उपलब्ध झाला. शालेय, महाविद्यालयीन मुलामुलींच्या हातातही स्मार्टफोन दिसायला लागले. पण, याच नव्या तंत्राच्या इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनच्या अतिवापर आणि या साधनाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे समाजात नव्या विकृत्यांचाही प्रवेश झाला. स्मार्ट फोनवर सेल्फी काढण्याच्या नादात देशात गेल्या दोन वर्षात 200 च्या वर युवक-युवतींचे बळी गेले आहेत. स्मार्टफोनवरच्या इंटरनेटचा किती आणि केव्हा वापर करायचा याला काही मर्यादा हव्यात, याचे भान तरुणाईला राहिलेले नाही. काही श्रीमंत पालक आपल्या मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन देताना, त्याचा गैरवापर तर होणार नाही याचा साधा विचारही करीत नाहीत.
Thursday, August 03, 2017 AT 08:52 PM (IST)
ही गोष्ट साधारण 1937-38 सालातली आहे. सोळा-सतरा वर्षाचे युवा नौशाद लखनौहून काहीतरी कामगिरी करण्यास बाहेर पडले होते. मुंबईत एक विद्वान प्राध्यापक नामीसाहेब कुलाब्यात राहात. त्यांच्या घरी ओळखीनं नौशाद राहात व दिवसभर कामाच्या शोधात स्टुडिओतून फिरत असत. मुंबईच्या भुलभुलैयात गरीब स्वभावाच्या नौशादचे पाकीट हरवले. जवळची पुंजी संपली. पण त्यांनी प्रयत्न मात्र सोडले नाहीत. कुलाब्यापासून दादरपर्यंत पायी चालून आलेल्या व दमून झोपलेल्या नौशादाकडे नामीसाहेबांचे लक्ष गेले. त्यांचे जोडेदेखील फाटून गेले होते. दुसर्‍या दिवशी त्यांनी नौशादकडून सर्व हकीकत समजली. पैशाशिवाय या मुंबईत चिकाटीनं राहणार्‍या नौशादचं त्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, ‘तू एक दिवस मोठा माणूस होणार आहेस व त्यावेळी मी तुला नक्की भेटेन.’ त्यानंतर स्वत: गरीब असलेल्या नामीसाहेबांनी त्यांना थोडे पैसे दिले व नौशाद यांच्या डायरीत आपले शब्द टिपून ठेवले. पुढे काळ गेला धर्मपारायण नौशाद यांनी परिश्रमानं, प्रयत्नानं चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. स्वत:ची मोठी वास्तू केली. ‘बैजू बावरा’च्या यशानं त्यांचं नाव गाजू लागलं.
Monday, July 31, 2017 AT 09:05 PM (IST)
  वैद्यकीय आणि उच्च तांत्रिक शिक्षणाच्या क्षेत्रात विनाअनुदानित संस्थांनी शिक्षणाचा अक्षरश: बाजार मांडल्याने, सर्वसामान्यांना अशा संस्थातून शिक्षण घेणे अति महागडे आणि अवाक्याबाहेरचे झाले आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्या महाविद्यालयांचे पूर्वीचेच लाखो रुपयांचे वार्षिक शुल्क परवडत नव्हते. बँकातून शैक्षणिक कर्जे काढून आपल्या मुलांना डॉक्टर करणार्‍या पालकांना, या पुढच्या काळात मात्र, असे स्वप्नही पाहणे शक्य नाही, अशी स्थिती महाराष्ट्रातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रचंड शुल्कवाढ केल्याने निर्माण झाली आहे. एम. बी. बी. एस. आणि बी. डी. एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या वार्षिक शुल्कात सरासरी 25 ते 30 टक्के वाढ करायला शैक्षणिक शुल्क समितीने मान्यता दिली. परिणामी साडे चार वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे शुल्क 21 ते 42 लाख रुपयांपर्यंत नव्या शुल्क वाढीने अधिक मिळणार असले तरीही राज्यातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना मात्र यापेक्षा अधिक शुल्कवाढ हवी आहे.
Monday, July 31, 2017 AT 09:04 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: