Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 44
सूर्य आणि वारा यांच्यात एकदा आपल्या शक्तीविषयी वाद जुंपला. दोघेही आपण सर्वात जास्त सामर्थ्यशाली असल्याचे पटवून देत होते. शेवटी रस्त्यावरून जाणार्‍या एका वाटसरूच्या अंगावरील घोंगडी बाजूला काढून ठेवण्यास जो भाग पाडेल तोच खरा पराक्रमी समजावा असे ठरले. प्रथम वार्‍याने जोराने वाहून ती घोंगडी उडविण्याचा प्रयत्न केला पण थंडी वाजायला लागल्यामुळे वाटसरू ती अधिकच घट्ट धरू लागला. शेवटी वारा दमला. मग सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली. त्यामुळे उकडायला लागून वाटसरूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगडी काढून ठेवली व तो सावलीत जाऊन बसला. कथा उपदेश : नुसत्या शक्तीचा काहीच उपयोग होत नाही.
Saturday, September 23, 2017 AT 09:17 PM (IST)
महर्षी धौम्य ॠषींनी आपल्या दुसर्‍या शिष्याची उपमन्युची परीक्षा घेतली. त्यांनी त्याचा आहार बंद केला. माधुकरी मागून आणल्यानंतर गुरूने त्याला काही दिले नाही. नंतर तर माधुकरी घ्यायलाही जाऊ दिले नाही. तो गाईचे दूध प्यायला गेला तर गुरूने त्याला मानाई केली. नतंर उपमन्युने वासरांचे दूध पिऊन झाल्यावर त्याच्या तोंडाचा जो फेस गळत असे तो प्राशन करायला सुरूवात केली. पण गुरूने त्यालाही बंदी घातली. नंतर उपमन्युने रूईच्या झाडाची पाने खाल्ली त्यामुळे त्याची दृष्टी गेली. त्यामुळे तो चालता चालता विहिरीत पडला. धौम्या ॠषी त्याला शोधत तिथे आले. त्याला त्यांनी देव वैद्य अश्‍विनीकुमारांची स्तुती करायला सांगितली. अश्‍विनीकुमार प्रकट झाले. त्यांनी उपमन्युला भोजन दिले. पण त्याने गुरूच्या आज्ञेशिवाय भोजन खाल्ले नाही. तेव्हा गुरू प्रसन्न झाले व अश्‍विनीकुमार यांनी उपमन्युला दुष्टीही दिली व सर्व विद्याही दिल्या. कथा उपदेश : गुरूने घेतलेल्या शिष्याच्या परीक्षेत तो पास झाला की विद्या प्राप्त होतात.
Saturday, September 16, 2017 AT 09:05 PM (IST)
एका विहिरीजवळ एक मुलगा खेळत होता. वाटेने एक चोर जात होता. चोराला पाहिल्याबरोबर मुलगा रडायला लागला. तेव्हा चोराने त्याला विचारले, काय रे? काय झालं? तो मुलगा म्हणाला, आई मला आता मारणार. कारण माझा चांदीचा गडू या विहिरीत पडला. काही काळजी करू नकोस. मी तुझा गडू काढून देतो असे म्हणून चोराने कपडे काढले आणि तो विहिरीत उतरला. आपल्याला सहज चांदीचा गडू पचवता येईल. या विचाराने तो खूश झाला होता. विहिरीचा तळ गाठून चोराने गडू शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तो गडू सापडलाच नाही. कारण गडू विहिरीत पडलाच नव्हता. अखेर निराश होऊन तो कुडकुडत वर आला. पाहतो तो काय तो मुलगा गायब आणि सगळे गावकरी हजर अशा तर्‍हेने चोर सापडला. कथा उपदेश : तल्लख बुद्धीचा वापर केल्याने धोका टळतो.
Saturday, September 09, 2017 AT 08:35 PM (IST)
एका गृहस्थाच्या घरी एक दिवस एक खास मित्राला मेजवानी होती. त्याचा एक कुत्रा होता. त्यानेही आपल्या एका दोस्त कुत्र्याला त्याच दिवशी आपल्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले. तो कुत्रा जेव्हा आला तेव्हा तयार होत असलेले चमचमीत जेवणाचे पदार्थ पाहतच राहिला. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या तो म्हणाला, काय मस्त मेजवानी मिळणार आज. अगदी पोट फुटेपर्यंत मी आज खाणार आहे. मग पुन्हा परवा सकाळपर्यंत पुन्हा खायला नको. आपल्या मित्रांवरच प्रेम दाखविण्याकरता तो आपली शेपटी हालवत राहिला. पण त्या शेपटीच्या वळवळ्यामुळे तिथल्या स्वयंपाक्याचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्याने ताबडतोब त्याचे पाय धरून त्याला घराबाहेर फेकून दिले. अर्थात रागाने आणि निराशेने भुकंत भुकंत तो आपल्या घरी निघाला. वाटेत त्याला त्याचा दुसरा मित्र भेटला. त्याने विचारले, काय कसं काय होतं जेवण? काही विचारू नको, तो म्हणाला, अरे, तेथे इतकी दारू होती की, मी तिच्यावर ताव मारला. त्या घरातून मी कसा बाहेर पडलो ते देखील मला समजत नाही. कथा उपदेश : दुसर्‍याच्या जीवावर जे जे आपल्याला चांगल्या गोष्टी देण्याचा आव आणतात त्यांच्यावर विश्‍वासून चालणे बरे नाही.
Saturday, September 02, 2017 AT 09:12 PM (IST)
एका शेतातल्या उंदराने शहरवासी मित्राला आपल्या घरी जेवायला बोलविले. शहरी मित्राने कुतूहलाने ते आमंत्रण स्वीकारले पण जेवणाचे पदार्थ म्हणजे नुसती धान्येच होती. ते पाहून शहरी उंदीर म्हणाला, ‘मित्रा, तू अगदी साध्या किड्यामुंगीसारखा जगतोस असं दिसतं. तू आता माझ्याबरोबर शहराकडे चल. तिथं सगळे चांगले पदार्थ आहेत. आपण दोघं मिळून ते खात जाऊ.’ त्याप्रमाणे ताबडतोब ते दोघे शहरात गेले. शहरी उंदराने त्या खेडवळ उंदराला पाव, खवा, सुकामेवा, शेंगा, साखर आणि फळफळावळ दाखविली. ते पाहून खेडवळ उंदीर अगदी दीपून गेला. त्याने आपल्या मित्राच्या भाग्याची स्तुती केली आणि स्वत:च्या कमनशिबाबद्दल त्याला वाईट वाटले. ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात दार वाजले. त्याबरोबर ते दोन छोटे जीव इतके घाबरले, की ते एका फटीत लपले. जरा वेळाने ते परत सुक्यामेव्याला तोेंड लावणार तोच पुन्हा दुसरे कोणीतरी त्या खोलीत आले आणि पुन्हा ते दोघेजण जीव घेऊन आपल्या बिळात शिरले. मग मात्र उपाशी राहावे लागले तरी चालेल पण आपलंच घर बरं असा त्या खेडवळ उंदराने निश्‍चय केला. ‘राम राम मित्रा!’ तो उसासा टाकून म्हणाला, ‘मला आपलं माझं ते कच्चं धान्यच बरं वाटतं.
Friday, September 01, 2017 AT 09:07 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: