Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 125
5म्हसवड, दि. 12 : सातारा - पंढरपूर रस्त्यावर म्हसवड येथील नामदेववस्ती येथे दुचाकी व सायकल यांच्यात धडक होऊन  मयूर महेश नामदे (वय 7)  हा शाळकरी मुलगा ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.   मंगळवारी दुपारी पाचच्या दरम्यान सातारा-पंढरपूर रस्त्यावर म्हसवड येथील नामदेववस्ती येथील मयूर महेश नामदे हा शाळकरी मुलगा सायकलवरून घरी वस्तीवर चालला असताना दुचाकीने दिलेल्या धडकेत  सायकलवरील मयूर  जाग्यावरच ठार झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास  हवालदार कुंभार हे करीत आहेत.
Wednesday, November 13, 2019 AT 08:38 PM (IST)
5कराड, दि. 12 : बारा डबरी येथील सूर्यवंशी मळ्याच्या रस्त्यावर ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारस घडली. विजय पांडुरंग शिंदे (वय 58), रा. मंगळवार पेठ, कराड असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सूर्यवंशी मळा येथे नगरपालिकेचे ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे.
Wednesday, November 13, 2019 AT 08:35 PM (IST)
5वाई, दि. 12 ः मेणवली (ता. वाई) येथील दिलीप कृष्णा शिखरे (वय 52) यांचा अज्ञात इसमाने धारदार शस्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून शिखरे यांचा दारू पिलेल्या अवस्थेत मध्यरात्रीच्या सुमारास खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राहत्या घराच्या मागे अंगणात शिखरे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दिलीप शिखरे यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांची बायको व दोन मुले पुणे (पिंपरी) येथे रहातात. वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून ते मुंबई येथे रहातात.  शिखरे यांचे बंधूही पोलीस दलात कार्यरत आहेत. शिखरे हे मेणवली येथे एकटेच राहत होते. स्वत:चे घर भाड्याने देवून त्यावरच ते आपल्या गरजा भागवत होते. घराशेजारीच असलेल्या छोट्या दुकान गाळ्यात ते राहात होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दारू पिलेल्या अवस्थेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात उजव्या बाजूस वार करून त्यांचा खून केला. घरासमोरील अंगणात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
Wednesday, November 13, 2019 AT 08:32 PM (IST)
5म्हसवड, दि. 10 ः माहेरी आलेल्या सौ. स्वप्ना रविकिरण सावंत यांचे सुमारे 74 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र (गंठण) व दोन सोन्याच्या अंगठ्या म्हसवड बसस्थानकात एस. टी.मध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सौ. स्वप्ना रविकिरण सावंत, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली या म्हसवडला माहेरी वडील दिनकर संभाजी बनसोडे यांच्याकडे दिवाळी सुट्टीसाठी आल्या होत्या. सासरी जाण्यासाठी फिर्यादी सौ. सावंत मुलगा तन्मय सावंत व वडील दिनकर संभाजी बनसोडे म्हसवड बसस्थानकात आले असता 12.45 वाजता अकलूज-कोल्हापूर या एस. टी.मध्ये चढत असताना त्या ठिकाणी मोठी गर्दी होती. गर्दीतून एस. टी.त चढल्यानंतर पाठीमागच्या सीटवर बसल्यावर गळ्यात अडकवलेली दोन कप्प्याची पर्स उघडून पाहिली असता पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र व दोन अंगट्या नसल्याचे लक्षात येताच गाडीतून खाली उतरून चौकशी केली व शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळून आले नाही.
Monday, November 11, 2019 AT 08:59 PM (IST)
5पिंपोडे बुद्रुक, दि. 10 : कवाडेवाडी, ता. कोरेगाव येथे तब्बल 13 बॉम्ब सापडले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथक व श्‍वान पथकाने (डॉग स्कॉड) हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. हे सर्व गावठी बॉम्ब असून शिकारीसाठी त्यांचा वापर होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी संशयित मनीबाबे सुपरचंद राजपूत (वय 45), मूळ गाव हरदवा, ता. रेठी, जि. कठणी (उत्तर प्रदेश) सध्या रा. कवडेवाडी, हिवरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी कवाडेवाडी येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ बॉम्ब शोधक पथकासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोधमोहीम सुरु झाली. सकाळी सुरु झालेले हे सर्च ऑपरेशन दुपारपर्यंत सुरु होते. कवाडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व बघ्यांची येथे गर्दीही झाली होती. 4 तासांहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहीम राबवल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार 13 हून अधिक बॉम्ब पोलिसांना सापडले.
Monday, November 11, 2019 AT 08:54 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: