Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 242
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला कलाटणी 5सातारा, दि. 22 : जुन्या आरटीओ चौकात गेल्या आठवड्यात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरील सौ. सारिका अभिजित देशमुख (मूळ रा. शिवथर, ता. सातारा, सध्या रा. पुणे) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांचा स्टोल दुचाकीत अडकल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र, सौ. देशमुख यांचा मृत्यू स्टोल दुचाकीत अडकल्यामुळे नव्हे तर ‘शिवशाही’ एस.टी. बसची पाठीमागून धडक बसल्याने झाल्याचे तपासात समोर आले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्याने तपासाला कलाटणी मिळाली आहेे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. सारिका या मुलीला घेऊन चुलत भावासोबत शुक्रवारी सातार्‍यात दवाखान्यात आल्या होत्या. दवाखान्यातून हे तिघे दुचाकी (एमएच-11-झेड-4355) वरून निघाले असता दुपारी आरटीओ चौकात शिवशाही एस.टी. (एमएच वाय 2464) बसची दुचाकीला मागून धडक बसल्याने तिघेही खाली पडले. यात सौ. सारिका देशमुख या जागीच ठार झाल्या.
Wednesday, May 23, 2018 AT 09:19 PM (IST)
भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश 5सातारा, दि. 21 : येथील शासकीय विश्रामगृह  येथे मुख्याध्यापकाला डांबून मारहाण करुन 5 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी तीन जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहेत. यामध्ये भाजपचा सुनील काळेकर, संदीप मेळाट व शिवसेनेचा हरिदास जगदाळे या तिघांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चार दिवसांपूर्वी शिक्षक अमोल कोळेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात संशयित  तीन जणांवर मारहाण, खंडणी प्रकरणी तक्रार दिली आहे. शासकीय विश्रामगृह येथील 9 क्रमांकाच्या खोलीत डांबून खंडणीसाठी राजकीय पदाधिकार्‍यांनी मारहाण केल्याची तक्रार शिक्षकाने केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीनही संशयित पसार झाले होते. जामीनासाठी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर  सोमवारी तिघांचा जामीन न्यायाधीशांनी फेटाळला.
Tuesday, May 22, 2018 AT 09:05 PM (IST)
5सातारा, दि. 21 : पोवई नाका येथे धारधार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवणार्‍या तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची जीवन संजय पवार (वय 24), परशुराम उत्तम जाधव (वय 33, दोघे रा. रविवार पेठ), सनी अशोक काटकर (वय 34, रा. शनिवार पेठ) अशी नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार धीरज कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शस्त्र बंदीचे उल्लंघन करुन शस्त्र बाळगल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Tuesday, May 22, 2018 AT 09:04 PM (IST)
5सातारा, दि. 21 : सातारा जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस हवालदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले आहे.  निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये लाच प्रकरणी पाटणच्या दोन जणांचा तर आदेश न मानल्या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाचा समावेश आहे.   सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार रुपयां प्रकरणी संजय बाळकृष्ण राक्षे, कुलदीप बबन कोळी या दोघांवर नुकतीच कारवाई केली आहे. हे दोघेही पाटण येथील एकाच पोलीस ठाण्यातील आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हे पोलीस मुख्यालय राहणार असून त्यांच्या प्राथमिक चौकशीचे (पीई) आदेश देण्यात आले आहे.  वाठार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. के. जगताप यांनी एका प्रशिक्षणास जाण्याबाबत नकार दिला. तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचनांचे पालन त्यांनी केले नाही. त्यामुळे जगताप यांनाही निलंबित करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हे कोरेगाव पोलीस ठाणे देण्यात आले आहे. या तिन्ही पोलिसांचे वर्तन बेशिस्त आहे. या पोलिसांच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली आहे.
Tuesday, May 22, 2018 AT 09:01 PM (IST)
5सातारा, दि. 21 :  दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने लिंब खिंडीनजीक जुन्या महामार्गावर रविवारी रात्री  झालेल्या अपघातात सौ. उज्ज्वला भरत पवार (वय 53, मूळ रा. महिगाव, ता. जावली सध्या रा. जरंडेश्‍वर नाका, सातारा) या जागीच ठार झाल्या.  याबाबत अधिक माहिती अशी, पवार दांपत्य रविवारी नातलगाचा बारशाचा कार्यक्रम असल्याने दुचाकीवरुन महिगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास ते साताराकडे येत होेेते. लिंब खिंड येथे दुचाकी आल्यानंतर महामार्गावरुन न जाता जुन्या रस्त्यावरुन ते निघाले होते. विठ्ठल-मंगलम मंगल कार्यालय परिसरात आल्यानंतर रस्त्यामध्ये एक मृत कुत्रे पडलेले होते.    रस्त्यावरील त्या मृत कुत्र्यावरुन दुचाकी गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सौ. उज्ज्वला पवार या रस्त्यावर पडल्या व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. मृत उज्ज्वला पवार या सातारा येथील गुजराथी अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेत शाखाधिकारी म्हणून कामाला होत्या.
Tuesday, May 22, 2018 AT 08:53 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: