Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 52
5कँडी, दि. 13 (वृत्तसंस्था) : हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या भारताच्या युवा खेळाडूंमुळे यजमान श्रीलंकेसमोर तिसर्‍या कसोटीत डावाच्या पराभवाचे संकट उभे ठाकले आहे. पांड्याच्या 86 चेंडूंमधील धुवाँधार शतकानंतर कुलदीप यादवच्या फिरकीपुढे लंकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने भारताच्या 487 धावसंख्येसमोर लंकेचा पहिला डाव 135 धावांमध्ये आटोपला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने फॉलोऑन दिल्यानंतर दुसर्‍या डावातही लंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर उपुल थरंगा दुसर्‍या डावातही लवकर तंबूत परतला. कुलदीप यादवने चार बळी घेऊन पहिल्या डावात लंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला मोहम्मद शमी, अश्‍विन व पांड्या यांची उत्कृष्ट साथ लाभली. या कसोटीत पांड्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पहिल्या डावात श्रीलंकेची अवस्था दयनीय झाली. कर्णधार दिनेश चंदीमलचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर उभा राहू शकला नाही. सलामीवीर उपुल थरंगा याही कसोटीत अपयशी ठरला. मोहम्मद शमीने तिसर्‍याच षटकात थरंगाला यष्टीरक्षक साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडले.
Monday, August 14, 2017 AT 08:56 PM (IST)
5कोलंबो, दि. 6 (वृत्तसंस्था) : शतकवीर दिमुथ करुणरत्ने आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही रवींद्र जडेजाच्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने कोलंबो कसोटी चौथ्या दिवशी श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे कोहली आणि कंपनीने तीन कसोटींची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. भारताने लंकेच्या भूमीत एका डावाने प्रथमच विजय मिळवला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने दोन वर्षांपूर्वी लंकेतच मालिका जिंकून यशोगाथेची सुरुवात केली होती. त्याच श्रीलंकेत एक कसोटी बाकी असतानाच भारताने मालिका जिंकून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. शतकवीर कुशल मेंडिस व दिमुथ करुणरत्ने यांनी तिसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांना घाम गाळायला लावला होता. मात्र, चौथ्या दिवशी जडेजा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. भारताने पहिल्या डावात 9 बाद 622 अशी बलाढ्य धावसंख्या उभारल्यावर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी लंकेचा पहिला डाव 183 धावांत गुंडाळल्यामुळे कोहलीने लंकेला फॉलोऑन दिला होता.
Monday, August 07, 2017 AT 09:06 PM (IST)
दुसर्‍या कसोटीत कोहलीपुढे सलामीच्या जोडीचा पेच 5कोलंबो, दि. 2 (वृत्तसंस्था) : श्रीलंकेविरुद्ध उद्यापासून सुरू होणारी दुसरी कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार असतानाच कर्णधार विराट कोहलीपुढे सलामीच्या जोडीचा पेच निर्माण झाला आहे. तापाने आजारी असलेला लोकेश राहुल तंदुरुस्त झाल्याने पहिल्या कसोटीतील सलामीवीर शिखर धवन व अभिनव मुकुंद यांच्यापैकी कोणाला वगळायचे, असा प्रश्‍न कोहलीपुढे आहे. अर्थात, मालिका जिंकण्याच्या टीम इंडियाच्या मार्गात या समस्येचा अडसर ठरणार नाही, हे निश्‍चित. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा नियमित सलामीवीर लोकेश राहुल हा खेळू शकला नव्हता. तो विषाणूजन्य तापाने आजारी असल्याने पर्यायी सलामीवीर शिखर धवनला सलामीच्या जोडीत संधी देण्यात आली होती. राहुलच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाच्या कामगिरीवर काहीही परिणाम झाला नव्हता. ही कसोटी भारताने तब्बल 304 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Thursday, August 03, 2017 AT 08:54 PM (IST)
लंकेला ‘फॉलो ऑन’ न देण्याचा निर्णय परेराची झुंज 5गॉल, दि. 28 (वृत्तसंस्था) : पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी गोलंदाजांनी श्रीलंकेचा संघ 291 धावांमध्ये गुंडाळाल्यानंतरही यजमानांना फॉलोऑन न देण्याचा निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. त्यानंतर दिवसअखेरीस भारताने दुसर्‍या डावात 3 बाद 189 अशी मजल मारून श्रीलंकेवर 498 धावांची आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात भारताचे तीन गडी माघारी परतले. अभिनव मुकुंद आणि विराट कोहली यांनी संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले आहे. गोलंदाजांनी श्रीलंकेला 291 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर कोहलीने यजमानांना फॉलोऑन देण्याऐवजी दुसर्‍या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावातील शतकवीर शिखर धवन व चेतेश्‍वर पुजारा हे लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर अभिनव मुकुंद आणि विराट कोहली यांनी तिसर्‍या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. गुणतिलकाने मुकुंदला पायचित केल्यावर तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या डावात निराशा करणार्‍या मुकुंदला दुसर्‍या डावात सूर गवसला. त्याने 81 धावांची खेळी केली. खेळ संपला तेव्हा कोहली 76 धावांवर नाबाद होता.
Saturday, July 29, 2017 AT 08:50 PM (IST)
5गॉल, दि. 27 (वृत्तसंस्था) : शिखर धवन व चेतेश्‍वर पुजारा यांच्या शतकांनंतर अजिंक्य रहाणे व हार्दिक पांड्या यांची अर्धशतके आणि अश्‍विन व मोहम्मद शमी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर रचला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी धाडला. त्यामुळे कसोटीच्या दुसर्‍याच दिवशी भारताने कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची अवस्था 5 बाद 154 अशी झाली होती. भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर रचल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात अडखळती झाली. वेगवान गोलंदाज उमेश यादव व मोहम्मद शमी यांनी यजमानांना जोरदार धक्के दिले. सलामीवीर दिमुथ करुणरत्नेला उमेश यादवने स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर उपुल थरंगा आणि कसोटी पदार्पण करणारा धनुष्का गुणतलिका यांनी लंकेचा डाव काहीसा सावरत दुसर्‍या विकेटसाठी 61 नावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीने गुणतिलका आणि कुशल मेंडिस यांना बाद करत श्रीलंकेची अवस्था बिकट केली. श्रीलंकेचे तीन फलंदाज 100 धावांच्या आतच माघारी परतले.
Friday, July 28, 2017 AT 09:03 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: