Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 9
  हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि दरवर्षी बर्फवृष्टी-तुफानी पाऊस पडणार्‍या जम्मू-काश्मीर राज्याला यावर्षी पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. राज्यातल्या शेकडो खेड्यात या वर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने सरकारने, पाणी टंचाईच्या भीतीने यावर्षी खरिपाच्या हंगामात शेतकर्‍यांनी भाताची लागवड करू नये, त्याऐवजी अन्य पिके घ्यावीत, असे आवाहन केले आहे. येत्या काही महिन्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे जाणवल्यामुळे राज्य सरकारने सरकारी यंत्रणेमार्फत शेतकर्‍यांनी भात पिकाची लागवड करू नये, यासाठी जागरण मोहीमही सुरू केली आहे. दरवर्षी या राज्यातल्या अडीच लाख हेक्टर क्षेत्रातल्या भाताच्या पिकाला जलसिंचन विभागातर्फे पाण्याचा पुरवठा केला जातो. पण पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताच्या पिकाला पाणी देता येणे शक्य नसल्याने, नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी भाताची लागवडच करू नये, असा सरकारचा सल्ला आहे. बारामुल्ला, कुपवाडा, बडगाम, पुलवामा, यासह सहा जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यातच भाताची पेरणी आणि लागवड केली जाते.
Wednesday, April 18, 2018 AT 08:48 PM (IST)
दोन वर्षांपूर्वी ज्या मुलीने पिस्तूल पाहिलेही नव्हते, त्याच मुलीने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दहा मीटर नेमबाजीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम घडवला आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हे लखलखीत यश मिळवणार्‍या मनूचे लक्ष्य आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायचे आहे. हरियाणातल्या सज्जर गोरिया या गावातल्या शाळेत शिकणार्‍या मनूचे वडील राम किशन नौदलात अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी या छोट्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. याच शाळेत तिची आई सुविधा मुख्याध्यापिका आहे. हरियाणात अद्यापही जुन्या रूढी परंपरांचा पगडा समाजात असल्याने मनूच्या आईचा विवाह अल्पवयातच झाला. त्यांना शिकायची जिद्द होती. विवाहानंतर त्या बी. ए. आणि  बी.एड. आणि नंतर एम. एड. झाल्या. संस्कृत विषयाच्या पदवीधर असलेल्या सुविधांनी मनूच्या जन्मानंतरही शिक्षण सुरू ठेवले.  मनू बाळ असताना त्या वार्षिक परीक्षा देत होत्या. झाशीच्या राणीचे मूळचे माहेरचे नाव मनू असल्याने, सुविधाने आपल्या मुलीचे नावही मनूच ठेवले. गावातल्या शाळेत मनू शिकायला लागली.
Friday, April 13, 2018 AT 08:48 PM (IST)
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाच साधूंना राज्य सरकारने राज्य मंत्रि-पदाचा दर्जा दिल्याचा वाद आता इंदौर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर गेला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नर्मदा जलशुद्धीकरण समितीत या पाच साधूंचा समावेश करून त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केल्यापासून हा वाद रंगला आहे. आता रामबहाद्दूर वर्मा यांनी आपल्या वकिलामार्फत इंदौर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून कोणत्या निकषावर आणि कोणत्या आधारे या साधूंना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिला, याबाबतचे प्रतिज्ञापत्र  येत्या 10 दिवसात दाखल करायचे आदेश राज्य सरकारला दिला आहे. नर्मदा जलशुद्धीकरणाच्या मोहिमेत नर्मदेच्या काठी सहा कोटी वृक्षारोपण केल्याचा दावा सरकारने केला होता. तेव्हा आता राज्य मंत्रिपदाचा दर्जा बहाल केलेल्या नर्मदानंद महाराज यांच्यासह पाचही साधूंनी या मोहिमेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करीत सरकारच्या विरोधात नर्मदा भ्रष्टाचार निर्मूलन-नर्मदा घोटाळा यात्रेची घोषणा केली होती.
Wednesday, April 11, 2018 AT 08:59 PM (IST)
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रसार करायसाठी 1921 मध्ये सीमा भागातल्या बेळगाव शहरात  स्थापन झालेल्या ‘राष्ट्रवीर’ या साप्ताहिकाचे गेली 33 वर्षे संपादक असलेल्या अ‍ॅड. रमेश विठ्ठलराव उर्फ राजाभाऊ पाटील यांना वाईच्या रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा यावर्षीचा विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे. महर्षी शिंदे यांच्या सामाजिक समतावादी विचारांच्या प्रसारासाठी ध्येयवादीपणे पत्रकारिता करणार्‍या पाटील यांचा होणारा हा सन्मान, म्हणजे मराठी पत्रकारितेत सत्यनिष्ठ पत्रकारिता करणार्‍या व्रती पत्रकाराचा गौरव होय! बेळगावमध्ये जन्मलेल्या पाटील यांचे शालेय शिक्षण बेळगावमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात झाले. बेळगावच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी झाल्यावर त्यांनी गेली 47 वर्षे बेळगाव-कोल्हापूर भागात वकिली केली आहे. छ. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने गुरुवर्य शामराव देसाई यांनी राष्ट्रवीर या साप्ताहिकाची स्थापना केली. देसाई यांच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दाजीबा देसाई यांनी या साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा सांभाळली.
Friday, April 06, 2018 AT 08:43 PM (IST)
भारतीय लष्कराच्या ‘राजपुतांना रायफल्स’ मधील लेफ्टनंट उमर फयाझ यांचे अपहरण करून त्यांची हत्या करणार्‍या धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चकमकीत ठार केल्यावर, आता काश्मीर खोर्‍यात पुन्हा अशांतता आणि दहशतीचे वातावरण निर्माण करायचे कारस्थान फुटीरतावाद्यांनी रचल्याचे उघड झाले आहे. काश्मीर खोर्‍यातल्या शोपियाँ आणि अनंतनागमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवादी लपून बसलेल्या घरांना सुरक्षा दलाच्या तुकड्या आणि पोलिसांनी गराडा घातल्यावर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. या दहशतवाद्यांना ठार मारायच्या निर्धाराने सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्यावर, दहशतवाद्यांना सुरक्षितपणे पळून जाता यावे, यासाठी परिसरातल्या नागरिकांनी घराबाहेर पडून सुरक्षा दलाच्या तुकड्यांवर तुफानी दगडफेकही केली. ही दगडफेक सुरू असतानाही सुरक्षा दलांनी माघार न घेता, दगडफेक करणार्‍या जमावाला पांगवत कारवाई सुरूच ठेवली.
Wednesday, April 04, 2018 AT 08:53 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: