Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 83
मसूर येथील थरारक घटना, सौ. सुवर्णा पवार यांच्या धाडसाचे कौतुक 5मसूर, दि. 18 : मातेने कवेत घेतलेला चिमुकला जीव अचानक ओढ्याच्या जोरदार  प्रवाहात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी माता आणि तिला मानवी साखळी करुन या दोघांनाही जीवदान देणारे नागरिक अशी थरारक घटना नुकतीच मसूर येथे घडली. या घटनेने जगातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याची ताकद मातृ हृदयात कायम असते हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. बाळाला वाचवण्यासाठी प्रवाहात स्वत:ला झोकून देणारी माता सौ. सुवर्णा पवार आणि तिला वाचवणारे नागरिक यांचे कौतुक होत आहे. या थरारक घटनेबाबत अधिक माहिती अशी, मसूर गावच्या मध्यभागी बाजार पेठेपासून काही अंतरावर ओढा आहे. अतिवृष्टीमुळे ओढ्यास पाणी भरपूर प्रमाणात आहे. ओढ्याच्या पलीकडे जटाशंकर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी पूल आहे. सध्या पुराचे पाणी कमी झाल्याने मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांनी सुरुवात केली आहे. येथील सौ. सुवर्णा पवार या कुटुंबीयांसमवेत मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. परत येत असताना कडेवर असलेला त्यांचा मुलगा राजवर्धन पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला.
Monday, August 19, 2019 AT 08:47 PM (IST)
5कराड, दि. 16 : भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी भावकीतील युवकाचा लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना रेठरे कॉलनी येथे बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अभिक्रांत राजेश रसाळ, रा. कार्वे, ता. कराड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अनिकेत राजेश रसाळ (वय 24), रा. कार्वे, ता. कराड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जयदीप शंकर रसाळ, रवीराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी, ता. कराड) असे खून प्रकरणी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली व फिर्यादीवरुन मिळालेली माहिती अशी, अनिकेत रसाळ हा त्याचा भाऊ अभिक्रांत बरोबर सेंट्रिंगचे काम करत होता. अनिकेतचे जयदीप रसाळ याच्या भाचीशी प्रेमसंबंध होते. जयदीप रसाळ व रवीराज रसाळ हे मूळचे कार्वे येथीलच परंतु कामानिमित्त ते रेठरे कॉलनी येथे राहत होते.
Saturday, August 17, 2019 AT 08:34 PM (IST)
5पाटण, दि. 13 :  पावसाचा जोर मंदावला असला तरी भविष्यात येणारा पाऊस आणि पूर्वेकडे कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून कमी करून आता 3 फूटांवर स्थिर करण्यात आले आहेत. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25 हजार 287 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणातून पूर्वेकडे कोयना नदी पात्रात प्रतिसेकंद 27 हजार 265 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. येणार्‍या पाण्यापेक्षा सोडण्यात येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणातील एकूण पाणीसाठ्यात घट होत आहे. धरणात आता एकूण 101.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा 96.35 टीएमसी इतका झाला आहे. आगामी काळातील पाऊस व येणारे पाणी याचा विचार करून याप्रकारे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
Wednesday, August 14, 2019 AT 08:33 PM (IST)
5कराड, दि. 11 ः सासू व मेव्हण्यावर असलेल्या रागातून जावयाने मेव्हण्याचा निर्घृण खून केल्याची घटना आगाशिवनगर, ता. कराड येथील दांगटवस्तीत शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सासू अनिता मुकेश पवार (वय 49), रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी जावई सागर शंकर जाधव (रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, ता. कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रणजित उर्फ निरंजन मुकेश पवार (वय 7) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी अनिता पवार यांची मुलगी सोनाली हिचा 2010 मध्ये सागर जाधव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सोनाली व सागर हे दोघेही अनिता पवार यांच्या घराजवळ दांगटवस्ती येथे वास्तव्यास होते. सागर जाधव यास दारूचे व्यसन आहे. सोनालीसोबत केलेल्या प्रेमविवाहास अनिता पवार यांचा विरोध होता. 2010 मध्ये अनिता पवार व जावई सागर जाधव यांच्यात भांडणे झाली होती. त्यावेळी सागरने सासू अनिता पवार यांच्या हातावर कोयत्याने वार केले होते.
Monday, August 12, 2019 AT 08:34 PM (IST)
5महाबळेश्‍वर, दि. 9 ः महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर कमी झाला आहे. महाबळेश्‍वरकडे येणारे सर्व रस्ते खुले झाले असून ते सुरक्षित आहेत. पर्यटकांसाठी येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. सहलीसाठी महाबळेश्‍वर सुरक्षित आहे. महाबळेश्‍वर बंद नाही. त्यामुळे पर्यटकांनी महाबळेश्‍वर येथे पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन येथील विविध संघटनांनी केले आहे. गेले 2 आठवडे येथे मुसळधार पाऊस सुरु होता. रोज 10 ते 14 इंच पाऊस पडत होता. हे सर्व पाणी कोयनेसह अनेक धरणातून सोडावे लागले होते. महाबळेश्‍वर हे उंचावर असल्याने येथे कितीही पाऊस झाला तरी येथे पाणी साचत नाही. त्यामुळे पाण्यापासून येथे कोणताही धोका नाही. प्रचंड पावसातही अपवाद वगळता महाबळेश्‍वरकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले आहेत. हे सर्व रस्ते सुरक्षित असल्यानेे वाहनांसाठी धोका नाही. प्रत्येक सुट्टीला येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक सहलीसाठी येथे येतात व आनंद लुटून परत जातात. असे असताना 4 दिवसांपासून सोशल मीडियावरून महबळेश्‍वर बंद असल्याचे चुकीचे संदेश फिरत आहेत. अनेक पर्यटकांनी येथे हॉटेलमध्ये रुम आरक्षित केल्या आहेत. सोशल मीडियावरून ज्या अफवा पसरत आहेत.
Saturday, August 10, 2019 AT 08:58 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: