Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 11
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, तरीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर का झाल्या नाहीत असा जाहीर सवाल करत केंद्रीय निवडणूक आयोगावर सुरू झालेली आरोप- प्रत्यारोपांची सरबत्ती करीत सुरू झालेेले राजकारण अखेर या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपले. गेली 23 वर्षे भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला असलेल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 2014 मधल्या लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केला होता. पक्षाने त्यांचेच नाव पंतप्रधानपदासाठी जाहीरही केले होते आणि त्यांनी देशव्यापी प्रचाराच्या तडाख्यात सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करून पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्या निवडणुकात मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याच्या झालेल्या चौफेर प्रगतीचा गाजावाजा देशभर झाला होता.
Friday, October 27, 2017 AT 09:02 PM (IST)
अमेरिका म्हणजे जगातला सर्वात सुखी-समृद्ध-श्रीमंत देश अशा समजुतीत या देशाचे गोडवे गाणार्‍यांना, अमेरिकेचे विकृत स्वरूप-अंतरंग लास वेगास शहरात एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करून 58 निरपराध्यांचे मुडदे क्रूरपणे पाडल्याच्या, चारशे जणांना जखमी केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता अशी बिरुदावली मिरवणार्‍या अमेरिकेच्या सामाजिक स्वास्थ्याचे खरे रूप लास वेगास मधल्या घटनेने, जगाला समाजावे, अशी अपेक्षा आहे. कॅसिनो आणि जुगारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या लास वेगासमधल्या मंडाले बे कॅसिनोच्या जवळच तीन दिवसांच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम होता. रविवारी शेवटच्या दिवशी तिथल्या स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडाले बे च्या 32 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून स्टिफन पॅडॉक या विकृत हल्लेखोराने, 13 एकर क्षेत्रातल्या खुल्ल्या मैदानात संगीताचा आनंद लुटणार्‍या हजारो रसिकांवर 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवल्याने, किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली गेली.
Wednesday, October 04, 2017 AT 09:08 PM (IST)
गेल्यावर्षी राज्यभरात निघालेल्या 57 विराट मराठा क्रांती मोर्च्यांद्वारे मराठ्यांच्या एकजूट आणि वज्रमुठीचे दर्शन सरकार-समाजालाही झाले. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात घडलेल्या मुलीवरच्या अत्याचार-बलात्काराच्या एका घटनेने, असंतोषाची ठिणगी मराठा समाजात पडली आणि बघता बघता राज्यभरात मराठी क्रांती मोर्च्यांचा वणवा पसरला. या मोर्च्यांची सांगता राजधानी मुंबईत लक्षावधींच्या अतिविराट, अतिप्रचंड, मोर्च्याने 9 ऑगस्ट क्रांतिदिनी झाली. हा मोर्चा महाप्रचंड असणार, याची खात्री सरकार आणि पोलिसांनाही असल्यानेच महानगरी मुंबईत  प्रचंड बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आदल्या दिवशी म्हणजेच 8 ऑगस्टपासूनच राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून  मराठा युवक, युवती आणि जनतेचा प्रवाह मुंबईच्या दिशेने वाहत होता. परिणामी 9 ऑगस्ट या मोर्चाच्या दिवशी सकाळीच विधानभवनाजवळचे आझाद मैदान जनसागराच्या आदळणार्‍या लाटांवर लाटांनी भरून गेले. भगवे झेंडे आणि छत्रपती शिवराय, जय जिजाऊंच्या गगनभेदी घोषणांनी महानगरी मुंबई दुमदुमत होती. महानगरी मुंबई कधीही थांबत नाही, असा समजही या मोर्च्याने खोटा ठरवला.
Friday, August 11, 2017 AT 09:08 PM (IST)
भारताच्या बाजारपेठात कधी, केव्हा आणि कोणत्या जीवनावश्यक वस्तूच्या किंमतीचा भडका उडेल, हे काही सांगता येत नाही. दोन वर्षांपूर्वी कांद्याचा भाव 80 ते 100 रुपयांवर गेला. गेल्या वर्षी तूर डाळ 200 रुपये किलोवर गेली. कांदा आणि अन्नधान्याच्या भावात वाढ होताच, शहरी भागातल्या जनतेला महागाई प्रचंड भडकल्याचे साक्षात्कार नेहमीच होतात. यावेळी मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकता यासह देशातल्या 17 महानगरात  गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोच्या आसपास गेल्याने, सामान्य जनतेलाही टोमॅटो महाग झाला. टोमॅटोच्या किंमतीचा असा काही भडका उडेल, हे केंद्र आणि राज्य सरकारांच्या कृषी खात्यांना अपेक्षित नव्हते. कारण नोटाबंदीनंतर गेले आठ महिने सर्वच भाजीपाल्यांचे भाव प्रचंड घसरले होते. खरिपाच्या कांद्याला खुल्या बाजारपेठात आणि बाजार समित्यात 500 ते 800 रुपये क्विंटल असा भावही मिळत नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आंदोलने करून कांद्याचे खुले सौदे बंद पाडले होते.
Thursday, August 03, 2017 AT 08:50 PM (IST)
1990 मध्ये पंतप्रधानपदावर असताना सत्तेचा गैरवापर करून परदेशात कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती केल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने, नवाझ शरीफ यांना तडकाफडकी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असीफ सईद खान खोसा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एक मताने दिलेल्या निर्णयात, शरीफ यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिध्द होत असल्याने, त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देताच पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पाकिस्तानसह जगातील अनेक राष्ट्रातील बडे राजकारणी, श्रीमंत आणि उद्योगपती आपला काळा पैसा पनामा येथे बोगस कंपन्या काढून बेनामी गुंतवणूक आणि संपत्ती मालमत्ता करतात. पनामामधल्या एका कायदा कंपनीने गेल्याच वर्षी अशा बड्या धेंडांची गोपनीय कागदपत्रे फोडून, खळबळ उडवली होती.  या गौप्य स्फोटात जगातील 128 राजकारण्यांची नावे होती आणि त्यात शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लंडनमध्ये केलेल्या मालमत्तेचा तपशीलही होता.
Monday, July 31, 2017 AT 09:01 PM (IST)
1 2 3
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: