Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 77
पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला 5सातारा, दि. 19 : प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सीता हादगे यांना त्यांचे पती राम हादगे यांनी नगरपालिकेच्या विविध वार्षिक  कामांसाठी निविदा भरल्या प्रकरणी अपात्र ठरविण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना अहवाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी तो दिला आहे. या अहवालात राम हादगे यांनी निविदा भरल्याचा उल्लेख आहे. नगरसेविका सीता हादगे यांनीही मुख्याधिकार्‍यांना 4 जून रोजी पत्र दिले असून त्यात पती राम हादगे यांच्याबरोबर सुसंवाद नसून त्यांनी भरलेल्या टेंडरबाबत विचार करू नये, असे लिहिले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. सातारा नगरपालिकेचा कारभार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नगरसेविकांच्या पतींच्या हस्तक्षेपाबाबत पालिकेच्या वर्तुळात नेहमीच चर्चा होत असते.
Tuesday, November 20, 2018 AT 09:00 PM (IST)
5सातारा, दि. 15 : एमआयडीसीमधील गोडावूनमधून तब्बल 7 लाख रुपयांची चहाची पावडर चोरणार्‍या दोन्ही कामगारांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) अटक केली आहे. चोरांकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांची दशरथ उत्तम फडतरे (वय 32, रा.शनिवार पेठ) व विलास हरी गायकवाड (वय 61, रा.केसरकर पेठ) अशी  नावे आहेत. या प्रकरणी जैमन दिलीप शहा (वय 30, रा.सदरबझार) यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एमआयडीसीमध्ये तक्रारदार यांची जी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनची देखभाल ठेवण्यासाठी संशयित दोन्ही कामगार आहेत. दि. 3 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत संशयितांनी गोडावूनचे शटर उघडून त्यातून 6 लाख 97 हजार 915 रुपये किंमतीची चहा पावडरची चोरी केली. यामध्ये सोसायटी, अमर डस्ट अशा विविध चहाचे 315 बॉक्स चोरी केले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. कामगारांनीच ही चोरी केल्याने मालकही हादरला होता. पोलिसांनी घटनेची दखल घेवून तातडीने हालचाली सुरू केल्या होत्या.
Friday, November 16, 2018 AT 09:26 PM (IST)
आढावा बैठकीत झापले एक वेतनवाढ रोखण्याचाही आदेश 5सातारा, दि. 15 :  कृषी राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. सदाभाऊ खोत यांचा मोबाईल न उचलणे कराडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना चांगलेच महागात पडले आहे. फोन  उचलला नाही म्हणून राजेश चव्हाण यांना ना. खोत यांनी चांगलेच खडसावले आणि बैठकीतच चव्हाण यांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आणि त्याबाबतची प्रक्रिया सुरू करा, असे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी दुष्काळ निवारण नियोजन आणि टंचाई आढावा बैठक सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, आ. जयकुमार गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील (रोहयो), निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर,  सर्व खातेप्रमुख आणि तहसीलदार उपस्थित होते. राज्यमंत्री खोत यांनी खंडाळा, कोरेगाव, माण आणि खटावचा आढावा घेतल्यानंतर कराडच्या विषयाकडे आपला मोर्चा वळवला. कराडचे तहसीलदार कोण आहेत, अशी विचारणा करताच पाठीमागे बसलेले राजेश चव्हाण उभे राहिले.
Friday, November 16, 2018 AT 09:19 PM (IST)
5सातारा, दि. 13 :  इंटरनेट बँकिंगद्वारे रामदास ज्ञानेश्‍वर जाधव (वय 35, रा. सोनगाव तर्फ सातारा) यांची 89 हजार 180 रुपयांची फसवणूक दि. 10 रोजी सकाळी झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Wednesday, November 14, 2018 AT 08:41 PM (IST)
मुख्याधिकारी, आरोग्य सभापतींच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित 5सातारा, दि. 12 : सोनगाव कचरा डेपोतील कचर्‍याच्या प्रदूषणाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सलग दुसर्‍या दिवशीही सातारा शहरातून कचरा गोळा करून आलेल्या गाड्या रोखून धरल्या. ग्रामस्थ कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर  मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य समितीचे सभापती यशोधन नारकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ग्रामस्थांना कचरा डेपोतून येणारा धूर बंद करण्याचा शब्द त्यांनी दिला. त्यामुळे सकाळपासून थांबवून ठेवलेल्या गाड्या ग्रामस्थांनी दुपारी सोडल्या.   सोनगाव कचरा डेपोत साठवल्या जात असलेल्या कचर्‍याचा जकातवाडी, सोनगाव आणि इतर गावांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. त्यातच कचरा पेटल्याने होत असलेल्या धुराने तर ग्रामस्थांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.    धुरामुळे ग्रामस्थांना जोरदार खोकला येवू लागला. त्यांचे डोके दुखू लागले. आपल्या समस्यांकडे कोणीही लक्ष देणार नाही हे लक्षात घेवून रविवारी  त्यांनी आंदोलन केले. आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Tuesday, November 13, 2018 AT 09:13 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: