Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 38
5सातारा, दि.14 : नाडे, नवारस्ता ता. पाटण येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना बेकायदा पिस्तूलसह वावरणार्‍या एका युवकास जेरबंद केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बेकायदा शस्त्रे बाळगणार्‍या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून माहिती प्राप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश दिले होते. दि.14 रोजी पथक पाटण परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना नाडे, नवारस्ता, ता. पाटण येथे एक संशयित इसम वावरत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे सापडली. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी पाटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत विजय कांबळे, शरद बेबले, रूपेश कारंडे, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत यांनी सहभाग घेतला.
Friday, February 15, 2019 AT 08:49 PM (IST)
5सातारा, दि. 13 : निंबोडी गावच्या हद्दीत दुचाकी रस्त्यावर घसरून झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुरज उमाजी मदने ( वय 23), रा. बिदाल, ता. माण हे दि. 12 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दुचाकीवरून लोणंद येथून निंबोडीकडे जात असताना निंबोडीजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Thursday, February 14, 2019 AT 08:57 PM (IST)
5सातारा, दि. 12: लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार झाल्याची घटना सातारा तालुक्यातील एका गावामध्ये घडली. याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की जानेवारी 2018  (तारीख माहीत नाही) ते दि.28 जानेवारी 2019 रोजी अक्षय मधुकर गायकवाड याने वेळोवेळी हमदाबाज परिसर, सिव्हिल हॉस्पिटल नजीकच्या एका खोलीवर तसेच रविवार पेठ येथील एका महिलेच्या खोलीवर लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास चव्हाण करीत आहेत.
Wednesday, February 13, 2019 AT 09:07 PM (IST)
5सातारा, दि. 5 : कृष्णानगर येथील अक्षय कृपा सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 25 तोळे सोने व रोख 20 हजार रुपये असा एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र रंगनाथराव फटाले (वय 48), मूळ राहणार बीड, सध्या हनुमंतराव जगदाळे यांच्या बंगल्यात 46, अक्षयकृपा सोसायटी, कृष्णानगर, सातारा हे एलआयसीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. काल रात्री 10 वाजता पत्नी रेखा आणि मुलगा श्रेयस यांच्या समवेत जेवण झाल्यानंतर झोपी गेले. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील भिंतीवरुन आवारात प्रवेश करून पाठीमागील खिडकीचा गज वाकवून रवींद्र फटाले यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. आतमध्ये अडकवलेल्या कपड्यां-मधील 20 हजार रुपये काढले. तदनंतर गजाच्या सहाय्याने कपाट तोडले.        आतमध्ये असलेले सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, हार, लॉकेट असे 22 तोळे सोने एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
Wednesday, February 06, 2019 AT 08:59 PM (IST)
दोन दुचाकी हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 5सातारा, दि. 24 : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 2 सराईत गुन्हेगारांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक करून त्यांच्याकडून 94 हजार 150 रुपयांच्या दोन दुचाकी, एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यामधील वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाला फलटण शहर व ग्रामीण परिसरातील चोरीचे पुणे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दि.23 जानेवारी रोजी विजय कुंभार यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड आपल्या पथकासह गोखळीपाटी, ता. फलटण गावच्या हद्दीत आसू ते फलटण मार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलीस रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार मोटरसायकलवरून जात असताना आढळले.
Friday, January 25, 2019 AT 08:49 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: