Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 59
5सातारा, दि. 21 : पोवई नाका येथे धारधार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवणार्‍या तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची जीवन संजय पवार (वय 24), परशुराम उत्तम जाधव (वय 33, दोघे रा. रविवार पेठ), सनी अशोक काटकर (वय 34, रा. शनिवार पेठ) अशी नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार धीरज कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शस्त्र बंदीचे उल्लंघन करुन शस्त्र बाळगल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Tuesday, May 22, 2018 AT 09:04 PM (IST)
5सातारा, दि. 18 : दुचाकीवरुन जाताना स्टोल चाकात अडकून जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी  झालेल्या अपघातात सौ. सारिका अभिजित देशमुख (मूळ रा. शिवथर, ता. सातारा, सध्या रा. पुणे) ही महिला ठार झाली. घटनेनंतर मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर बघ्यांची गर्दीही झाली होती. दरम्यान, अपघातात सारिका यांची चार वर्षाची मुलगी अन्वी व दुचाकीस्वार चुलतभाऊ किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सौ. सारिका या मुलीला घेवून चुलत भावासोबत सातार्‍यात दवाखान्यात आल्या होत्या. दवाखान्यातील काम झाल्यानंतर हे तिघेही (क्र. एम. एच. 11-झेड 4355) या दुचाकीवरुन निघाले होते. ही दुचाकी दुपारी आरटीओ चौकात आली. त्यावेळी सारिका यांच्या गळ्यातील स्टोल दुचाकीच्या चाकात अडकला होता. त्यांच्या गळ्यातील स्टोल चाकामध्ये गुंडाळला गेल्याने दुचाकीचे चाक जॅम झाले. या घटनेने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, सौ. सारिका या जमिनीवर आदळल्या गेल्या व पोटातून थोडी आतडी बाहेर आली होती. दुसरीकडे त्यांची मुलगी व दुचाकीस्वारही बाजूला फेकले गेले. ते बाजूला फेकले गेल्यानेच  बचावले.
Saturday, May 19, 2018 AT 08:33 PM (IST)
5सातारा, दि. 16 : स्व. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून आलौकिक अशी क्रांती घडवली. अजिंक्य उद्योग समूहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करुन त्यांनी सर्वांना सहकारातून उध्दाराकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरुन वाटचाल करुन शेतकरी हित जोपाण्यासाठी सहकार चळवळ जोमाने सुरु ठेवू, असा निर्धार स्व. आ. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त करण्यात आला.  सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिंक्य उद्योग समूहाचे संस्थापक स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी 10.30 वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि शेंद्रे कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पूर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास विविध मान्यवर व असंख्य कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ.
Thursday, May 17, 2018 AT 08:54 PM (IST)
जिल्ह्यातील 1 लाख 50 हजार 486 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ 5सातारा, दि. 14 : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकूण 366 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 955 शेतकर्‍यांपैकी 1 लाख 50 हजार 486 शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आहे. गतवर्षी नोटाबंदीमुळे बँकेला 18 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. यंदा बँकेला 51 कोटी 89 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, बँकेची जी बजेटची सभा झाली त्यामध्ये शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. बँकेला जो काही निव्वळ नफा झाला आहे त्यातून 8 कोटी 75 लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शेती पतस्थैर्य राहण्यासाठी 5 कोटी 25 लाख, तंत्रज्ञान विकास निधी 1 कोटी, इमारत निधी 1 कोटी, गुंतवणूक चढ- उतार निधी 50 लाख, भाग भांडवल लाभांश 16 कोटी 22 लाख अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Tuesday, May 15, 2018 AT 08:38 PM (IST)
5सातारा, दि. 13 : कासला वणवा लावला, असे वाचल्याबरोबरच उंबरठा चित्रपटातील अंगी वणवा पेटला...या गाण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. या महिन्यात गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारे कास पठारावर वणवा लावण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. हा वणवा लागला जात नसून विघ्नसंतोषी लोकांकडून तो जाणीवपूर्वक लावला जात आहे. अशा वणवा लावणार्‍या विघ्नसंतोषी लोकांना रोखणार कोण, असा प्रश्‍न पर्यटकांमधून केला जात आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेस 23 किलोमीटर अंतरावर कास पठार आहे. पठारावर ठराविक काळात उगवणार्‍या फुलांमुळे या पठाराचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पसरले आहे. निसर्गरम्य परिसर, उंच डोंगराच्या दोन्ही बाजूला असलेले कण्हेर व उरमोडी धरणाचे पात्र, हिरवी गर्द झाडी, कडक उन्हाळ्यातही वाहणारा थंड वारा शिवाय प्रसिद्ध असलेला कास तलाव. त्यामुळे या भागात कायमच स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ असते. राज्याच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक या भागाला दररोज भेटी देतात. याच परिसरात असलेल्या पुष्प पठारावर काही विघ्नसंतोषी पर्यटकांनी वणवा लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या वणव्यामुळे पठारावरील बराचसा भाग जळून खाक झाला आहे.
Monday, May 14, 2018 AT 09:01 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: