Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 18
5सातारा, दि. 11 :  कोडोली येथील होलसेल किराणा दुकानातून 3 लाख रुपयांचे 380 किलो काजू  खरेदी करताना खोटा धनादेश देवून फसवणूक करणार्‍यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत मोरया मेगा मार्टचे मालक कुमार बाळासाहेब चव्हाण (रा. कर्मवीरनगर, कोडोली) यांनी  तक्रार दिली आहे. चव्हाण यांचे होलसेल किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात दि. 5 रोजी दुपारी चारच्या सुमारास फसवणूक करणारी अनोळखी व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात काजू आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी त्याला दुकानात असणारे काजूचे विविध प्रकार दाखवले. यापैकी एका प्रकारच्या काजूची निवड करत त्या व्यक्तीने चव्हाण यांच्याकडून 3 लाख 2 हजार रुपये किंमतीचे 380 किलो काजू खरेदी केले. खरेदी केलेल्या काजूच्या बदल्यात पैसे देण्याऐवजी त्या व्यक्तीने दुकानदार चव्हाण यांना आयसीआयसीआय बँकेच्या नावाचा धनादेश दिला. मात्र तो धनादेश  खात्यात वटण्यासाठी भरला असता तो वटला नाही. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होवू शकला नाही.
Friday, October 12, 2018 AT 09:05 PM (IST)
आजपासून अंमलबजावणी सुरू 5सातारा, दि. 9 : सातार्‍यात पोलिसांनी डॉल्बीविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. गणेशोत्सवात डॉल्बी वाजू न देण्यात पोलीस यशस्वीझाले होते. गणेशोत्सवाप्रमाणेच पोलिसांनी नवरात्रीतही डीजेबंदी यशस्वी करण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून 144 प्रमाणे पोलिसांना डीजेबाबत अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना सर्व डीजे जागीच सील करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे नवरात्रातही सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे घटस्थापनेपासून म्हणजे बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, डॉल्बी वाजू द्यायची नाही, असा निर्धार पोलिसांनी गणेशोत्सवात केला होता आणि तो यशस्वीही करुन दाखवला होता. आता तसाच निर्धार त्यांनी नवरात्रोत्सवासाठी केला असून त्यासाठी ठोस पावले टाकली आहे. नवरात्रीनिमित्त  नऊ दिवस देवीचा जागर होत आहेे. नवरात्रीनिमित्त दांडियाच्या माध्यमातून व दुर्गादेवीच्या  मिरवणुकीत डॉल्बीचा वापर  होण्याची शक्यता  असते.
Wednesday, October 10, 2018 AT 08:41 PM (IST)
5सातारा, दि. 2 : खेकडे पकडताना म्हसवे, ता.सातारा गावच्या हद्दीतील वेण्णा नदीत  मनोहर सखाराम इंगळे (वय 50, रा.पिलेश्‍वरीनगर, करंजे) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत प्राथमिक माहिती अशी, इंगळे हे नेहमी सहकार्‍यांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी खेकडे, मासे पकडण्यासाठी जात होेते. मंगळवारी ते म्हसवे गावाच्या हद्दीत असणार्‍या वेण्णा नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी दुपारी गेले. खेकडे पकडत असतानाच इंगळे हे पाय घसरून पडले आणि पाण्यात बुडू लागले. बुडणार्‍या इंगळे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले. यावेळी आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकही जमा झाले. मात्र तोपर्यंत ते बुडाले होते. दुपारी उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
Wednesday, October 03, 2018 AT 08:55 PM (IST)

Wednesday, October 03, 2018 AT 08:45 PM (IST)
5सातारा, दि. 28 : सातारा शहराला शुक्रवारी दुपारी तासभर पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे.  त्यातच स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले आहे. विचित्र हवामानामुळे नागरिक त्रस्त असतानाच गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने थोडासा दिलासा दिला होता. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. त्यामुळे आजही पाऊस सटकून पडणार असे वाटत असतानाच दुपारी 2 च्या सुमारास काळे ढग दाटून आले व पावसास सुरूवात झाली. पावसाचे थेंबही टपोरे होते. परंतु थोड्यावेळाने पावसाने काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा काही वेळ पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. उष्णता जास्त असल्यामुळे रस्ते काही वेळेतच खडखडीत सुकत असल्याचे जाणवले. रात्रीपर्यंत पावसाळी वातावरण कायम होते.
Saturday, September 29, 2018 AT 09:01 PM (IST)
1 2 3 4
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: