Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 4
गणेश विसर्जनाला पुढच्या वर्षी जागा न देण्याचा जिल्हा परिषदेत निर्णय 5सातारा, दि. 28 : जिल्हा परिषदेच्या सभेत स्वमालकीच्या जागांकडे दुर्लक्ष करू नका. प्रतापसिंह शेतीशाळेच्या जागेबाबत जे झाले, ते होवू नये. आपण रखवालदार आहोत, आपणच झोपलो तर कसे होईल. सगळ्याच जागा गिळंकृत होतील, असा आरोप सदस्यांनी केला. त्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक -निंबाळकर यांनी पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. जिल्हा परिषदेच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन मशीन घेणार का नाही, हे स्पष्टपणे जाहीर करा, अशी मागणी एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली. दरम्यान, शिक्षकांचे समायोजन, केंद्र प्रमुखांच्या पदोन्नत्या झाल्या नाहीत याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी येत्या आठ दिवसात प्रश्‍न मार्गी लागेल, असे सांगून वेळ मारून नेली. सातार्‍याच्या गणेश विसर्जनासाठी पुढच्या वर्षी जागा न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला. सभेत विषयपत्रिकेचे वाचन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी केले.
Saturday, September 29, 2018 AT 09:02 PM (IST)
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करणार 5सातारा, दि. 5 : सार्वजनिक गणेशोत्सवात धटिंगगिरी करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांची पोलिसांशी गाठ आहेे, असा इशारा नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी सार्वजनिक मंडळांच्या बैठकीत  दिला. दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.   सातारा शहर व तालुक्यातील गणेश मंडळे, पोलीस पाटील यांची बैठक पोलीस करमणूक केंद्रात बुधवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक गजानन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख पुढे म्हणाले, सार्वजनिक मंडळांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल. मात्र  चुकीचे वागणार्‍यांची गय केली जाणार नाही. मोहरम आणि गणेशोत्सव नजीकच्या काळात आहे. सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. कोठेही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती कळवावी.
Thursday, September 06, 2018 AT 08:48 PM (IST)
प्रशासन दक्ष : जिल्हाधिकारी 5सातारा, दि. 20 : देशातील वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्यावतीने शुक्रवारपासून बेमुदत देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातही हे आंदोलन सुरू करण्यात आले असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संघटनेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश गवळी यांनी दिली. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. वाहतूकदारांच्या समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सरकारसमोर मागण्या मांडत असूनही ठोस कार्यवाही होत नाही. महसूल विभागानंतर देशाला सर्वाधिक महसूल वाहतूकदारांकडून मिळतो. या व्यवसायाशी 20 कोटी लोक निगडीत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, ई-वे बिल या निर्णयांमध्ये आम्ही सरकारबरोबर राहिलो तरी आमच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. डिझेलचे दर कमी करावेत, या दरात संपूर्ण देशात समानता हवी.
Saturday, July 21, 2018 AT 08:47 PM (IST)
नोकरीसाठी 4 लाखांचा दर : अ‍ॅडव्हान्स घेवून फसवणूक 5सातारा, दि. 21 : सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोडोली येथील एकाची फसवणूक करणार्‍या प्रतीक्षा बाळकृष्ण भोसले (रा. गुरुवार पेठ, सातारा) या महिलेविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोकरी विकण्यासाठी 4 लाखांचा दर काढला होता. त्यापैकी व्यवहार ठरल्यानंतर त्यातील 85 हजार रुपये संशयित महिलेला दिले होते. याबाबत मुरलीधर कृष्णा जावळे (रा. कोडोली) यांनी तक्रार दिली. प्रतीक्षा भोसले यांच्या आई सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. मात्र नोकरीवर असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा भोसले यांनी पालिकेत नोकरीचा दावा केला. त्यानुसार प्रतीक्षा यांचा दावा मंजूर करण्यात आला. मात्र पालिकेची नोकरी करण्यास प्रतीक्षा भोसले यांची तयारी नव्हती. याचदरम्यान प्रतीक्षा यांना कोडोली येथे राहणारे मुरलीधर जावळे हे भेटले. या भेटीत जावळे यांनी तुमच्या जागेवर माझ्या पत्नीला नोकरी लावा, असे प्रतीक्षा यांना सांगितले.
Friday, June 22, 2018 AT 08:49 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: