Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 96
5जम्मू, दि. 18 (वृत्तसंस्था) :  कलम 370 हटवल्यानंतर पसरवण्यात येणार्‍या अफवा रोखण्यासाठी रविवारी पुन्हा जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अफवा रोखण्यासाठी आणि परिसरात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. इंटरनेट सेवा दुपारनंतर तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पसरवण्यात येणार्‍या अफवा रोखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास पंधरवड्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. ...तरीही अफवा पसरवल्याच! सोशल मीडियावर बोगस मेसेज अथवा व्हिडिओ व्हायरल केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिला होता. मात्र, तरीही काही लोकांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यास सुरुवात केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील दोघांवर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Monday, August 19, 2019 AT 08:21 PM (IST)
5पोखरण, दि. 16 (वृत्तसंस्था) :  भारताच्या संरक्षणविषयक धोरणांमध्ये येत्या काळात बदल होण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. अण्वस्त्रांच्या वापराबाबत भारताने ‘नो फर्स्ट युज’ अर्थात पहिल्यांदा वापर करायचा नाही, हे धोरण अवलंबले आहे. मात्र, भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. शुक्रवारी पोखरण येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. दरम्यान, राजनाथ यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. त्यात ते म्हणतात, पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्त्वही निश्‍चित केले. भारत या तत्त्वाचे कसोशीने पालन करत आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
Saturday, August 17, 2019 AT 08:32 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि जम्मू-काश्मीर व लडाखबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काश्मिरी जनतेचा अधिकच फायदा होईल, असा विश्‍वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. रामनाथ कोविंद यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी आणि देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परिने योगदान देण्याचे आवाहन केले. वर्षभरात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील संकल्पांचाही त्यांनी या भाषणात उल्लेख केला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटविण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरही भाष्य केले. ‘जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल. काश्मिरी जनतेलाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणारे सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल.
Friday, August 16, 2019 AT 08:27 PM (IST)
5मुंबई, दि.13 (प्रतिनिधी) : सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, या मदतीची वाट न बघता राज्याच्या तिजोरीतून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. पूरग्रस्त भागातील पडझड झालेली तसेच पूर्ण नष्ट झालेली घरे सरकार बांधून देणार आहे तसेच पिकांच्या नुकसानीबद्दल 2088 कोटींची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली आहे. या आपत्तीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार्‍या मदतीच्या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. पूरग्रस्त भागासाठी केंद्राकडे एकूण 6 हजार 813 कोटींची मदत मागण्यात आली आहे.
Wednesday, August 14, 2019 AT 08:32 PM (IST)
कोल्हापूर, सातार्‍यात अतिवृष्टीचा इशारा 5कोल्हापूर, दि. 12 (प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर आठ दिवसानंतर सोमवारी सकाळी सहापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शिरोलीतून                  कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी फक्त अवजड वाहतुकीला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी असल्यामुळे कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती. महामार्गाची पाहणी करून ही वाहतूक सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. रविवारी दुपारी पहिला टँकर सोडल्याने लोकांमध्ये महामार्ग सुरू झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे अडकलेल्या लोकांनी वाहनांसह महामार्गाच्या दिशेने कूच केली होती. परिणामी पोलीस अधीक्षकांना याबाबत खुलासा करावा लागला होता. कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार, दि. 5 ऑगस्ट रोजी महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
Tuesday, August 13, 2019 AT 08:28 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: