Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 65
5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीचे संबंधित ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे असलेले दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडे दोन कोटी ते साडेसात कोटी रुपयांपर्यंतच्या कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार सुधारित करून ते आता पाच कोटी रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. पाच कोटी रुपयांवरील कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची कामे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत करण्यात येतात. या समितीला दोन कोटीपर्यंतच्या कामाच्या अंमलबजावणीचे अधिकार आहेत. समितीमार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या योजनांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी होत्या. अनेक ठिकाणी ही कामे दीर्घकालावधीसाठी रेंगाळण्यासह त्यासाठी असणार्‍या निधीतही अपहाराच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महत्त्वाच्या योजना रखडल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Friday, February 23, 2018 AT 08:24 PM (IST)
राज्यात 14 लाख 85 हजार विद्यार्थी प्रविष्ठ 5पुणे, दि. 20 (प्रतिनिधि) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा आजपासून (दि. 21)  सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या नऊ विभागातून कला, विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) या चार शाखांमधून एकूण 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमावर घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन करण्यासाठी 10  समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.
Wednesday, February 21, 2018 AT 08:28 PM (IST)
5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव प्रकरणी सर्व 11 आरोपींचे जामीन अर्ज मुंबई विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यात मोजोस ब्रिस्टो पबचे मालक युग टुली आणि युग पाठक, वन अबव्ह पबचे मालक जिगर संघवी, क्रिप्रेश संघवी आणि अभिजित मानकर, कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक असलेले रमेश गोवानी, या ठिकाणचा हुक्का सप्लायर उत्कर्ष पांडे, अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी तसच वन अबव्हचा मॅनेजर केवीन बावा आणि लोपेज या 11 जणांचा जामीन मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कमला मिल अग्नितांडव प्रकरणी एमआररटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली होती.      एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोजोस ब्रिस्टोचे संचालक युग पाठक, युग टुली, वन अबव्ह संचालक क्रिपेश संघवी, अभिजित मानकर यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरटीपी अंतर्गत पालिकेनं हा एफआयआर दाखल केला होता.
Saturday, February 17, 2018 AT 08:33 PM (IST)
गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 200 कोटींची मागणी करणार : ना. फुंडकर 5मुंबई, दि.14 (प्रतिनिधी) : गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले असताना सरकारनेही तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे. कोरडवाहू जमिनीसाठी एकरी फक्त 2 हजार 700 रुपये तर बागायती जमिनीसाठी एकरी 5 हजार 400 मदत देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी केली. मोसंबी आणि संत्रासाठी हेक्टरी 23 हजार 300 रुपये, केळीच्या बागेसाठी हेक्टरी 40 हजार रुपये, आंब्यासाठी हेक्टरी 36 हजार 700 रुपये तर लिंबासाठी हेक्टरी 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 200 कोटी रुपयांची मदत मागण्यात आली असल्याचे ना. फुंडकर यांनी सांगितले. मराठवाडा आणि विदर्भात रविवारी व नंतर झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला आहे.
Thursday, February 15, 2018 AT 08:33 PM (IST)
पाच ठार, अकरा जखमी 5कोची, दि. 13 (वृत्तसंस्था) : केरळच्या कोचीन शिपयार्डमध्ये जोरदार स्फोट झाला असून त्यात पाच जण ठार झाले आहेत. या स्फोटात 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ओएनजीसीचे एक जहाज दुरुस्तीसाठी आणण्यात आले होते. ही दुरुस्ती करताना जहाजात अचानक स्फोट होऊन आग लागल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमनदलाचे जवान आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. आज सकाळी शिपयार्डमध्ये जोरदार आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरून गेल्याने एकच धावपळ उडाली.
Wednesday, February 14, 2018 AT 08:30 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: