Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 59
नगरला कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही : विखे-पाटील 5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अडचणीत आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आज प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आले. आपली बाजू पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असून ते जो निर्णय देतील तो मान्य करू, असे सांगताना विरोधी पक्षनेतेपदाचा स्वतःहून राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्व. बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत  केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना नगरला कोणाच्याच प्रचाराला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने नगर लोकसभा मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आहे. विरोधी पक्षनेत्यांचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली असून राधाकृष्ण विखे हेदेखील अडचणीत आले आहेत. ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा कालपासून सुरू होती.
Friday, March 15, 2019 AT 08:39 PM (IST)
लोकसभा निवडणुकीच्या कामातून वगळले 5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परीक्षा काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दिल्या जाणार्‍या कामातून वगळण्यात आले आहे. याबाबाबत निवडणूक आयोगाने आज परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यातील किमान पन्नास हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी घेतले असून त्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी आमदार कपिल पाटील    आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍विनीकुमार यांच्याकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी ए. एन. वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नेमलेल्या नियामक व परीक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका झाली आहे.
Thursday, March 14, 2019 AT 09:01 PM (IST)
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या मुलालाच भाजपमध्ये घेऊन काँग्रेसला धक्का दिल्यानंतर येत्या आठ दिवसांत असे अनेक मोठे राजकीय भूकंप होतील, असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. इतर पक्षांनी आता आपली ताकद आणि पैसा 2024 च्या निवडणुकीसाठीच वाचवून ठेवावा, हे ओमर अब्दुल्ला यांचे मत खरे ठरणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मंगळवारी डॉ. सुजय विखे- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या पाठोपाठ इतर पक्षातील अनेक बडे नेतेदेखील भाजपच्या मार्गावर असून लवकरच तुम्हाला मोठ्या राजकीय भूकंपाचे धक्के अनुभवायला मिळतील, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. 2019 च्या निवडणुकीत पक्षाचा वेळ आणि पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही. तो 2024 साठी वाचवून ठेवावा, असा सल्ला जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वडिलांना दिला आहे. तो खराच आहे. कारण 2019 ची निवडणूक पूर्णपणे भाजप, रालोआच्याच बाजूने असणार आहे.
Wednesday, March 13, 2019 AT 08:59 PM (IST)
जोरदार अफवेमुळे खळबळ मुख्यमंत्र्यांकडून खंडन 5 मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या (शुक्रवार) होणार्‍या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा विसर्जित करून लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकाही एकत्र घेण्याचा निर्णय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावताना, महाराष्ट्रात लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत नाहीत, लिहून घ्या’, असे स्पष्ट केल्यानंतरही चर्चा सुरूच आहे. राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, विधानसभेची निवडणूक ठरलेल्या वेळीच होईल, असे स्पष्टीकरण सरकारने या आधी केले होते पण बुधवारी रात्रीपासून पुन्हा या चर्चेला उधाण आले. राज्य सरकारने गेल्या चार-पाच दिवसांपासून रखडलेले निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत 22 निर्णय घेतल्यानंतर पुन्हा लगेचच शुक्रवारीही (दि. 8) मंत्रिमंडळ बैठक होणार आहे.
Friday, March 08, 2019 AT 08:36 PM (IST)
5मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून 1 जानेवारी 2011 पूर्वीची दीड हजार चौरस फुटांपर्यंतची सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील महापालिका, नगरपालिका, व नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या असंख्य लोकांना होणार आहे. मात्र, वन विभागाच्या जमिनींवरील कोणतेही अतिक्रमण नियमित होणार नाही. केंद्र व राज्य सरकारने 2022 पर्यंत सर्व बेघरांना घरे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. राज्यातील 382 शहरे आणि त्या शेजारील क्षेत्रांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येणार आहे. या धोरणानुसार झोपडपट्ट्या आहेत त्याच ठिकाणी विकास करण्याची योजना आहे पण काही लोक या महत्त्वाकांक्षी योजेनपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारितील कोणत्याही प्रकाराच्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणांबाबत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
Thursday, March 07, 2019 AT 08:49 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: