Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 12
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला 5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : पूरग्रस्त बांधवांसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला. पुराच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. आज दुपारी शिवसाहित्य मदतीचे ट्रक, रुग्णवाहिका शिवाजी पार्क, दादर येथून सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशी मदत शिवसेनेतर्फे करण्यात आली. या संदर्भातील माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता त्यांनी त्याविषयी आता काही बोलण्याची वेळ नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, मला राजकारणात पडायचे नाही. जे जे आवश्यक आहे, ते करणे मला महत्त्वाचे वाटते.
Monday, August 12, 2019 AT 08:54 PM (IST)
2200 जादा बसेस सोडणार 27 जुलैपासून ऑनलाइन आरक्षण 5मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांसाठी एस. टी. महामंडळातर्फे तब्बल 2,200 जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यातील जादा बस सेवेचा लाभ घेता येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री व एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी याबाबत माहिती दिली. येत्या 27 जुलैपासून जादा गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे. या वर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील एकाच वेळी, म्हणजे 27 जुलैपासून करता येणार आहे. ग्रुप बुकिंग 20 जुलैपासून गणपती उत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा एकाच रस्त्यावर पडणार्‍या गावात जाण्यासाठी एस. टी.ची बस आरक्षित करतात. ही बस त्यांना सोयीची ठरते. अशा गट आरक्षणाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. संबंधित प्रवाशांनी ग्रुप बुकिंगसाठी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
Saturday, July 20, 2019 AT 08:52 PM (IST)
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : पीक विमा कंपन्या तसेच बँकांनी शेतकर्‍यांच्या विम्याची तसेच कर्जमाफीची रक्कम येत्या पंधरा दिवसात अदा करावी ही आमची आज हात जोडून नम्र विनंती आहे. पंधरा दिवसात जर हे झाले नाही तर सोळाव्या दिवशी शिवसेना या कंपन्या तसेच बँकांच्या पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. आज केवळ इशारा देण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. अन्यथा सोळाव्या दिवसापासून हा मोर्चा ‘बोलायलाही’ लागेल, असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक निधी दिलेला असतानाही विमा कंपन्या शेतकर्‍यांची अडवणूक करत असल्याचा आरोप आहे.    या विरोधात शिवसेनेच्यावतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती एक्सा या कंपनीच्या कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते.
Thursday, July 18, 2019 AT 08:43 PM (IST)
औदुंबर भिसे 5भंडीशेगाव, दि. 9 (प्रतिनिधी) : कुंचे पताका झळकती । टाळ, मृदंग वाजती ॥ आनंदे प्रेम गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥ भागवत धर्माची पताका फडकावीत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगावरील अतूट श्रद्धा व संतांचे पायी विश्‍वास ठेवून आषाढी वारीने पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरजवळ टप्पा येथे पोहोचला. संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधू भेटीच्या सोहळ्यानंतर मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात लाखो वैष्णवांसह संतांच्या पालखी सोहळ्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. पंढरपूर तालुका प्रवेशानंतर संत ज्ञानदेवांचा व सोपानदेवांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. उद्या, दि.10 रोजी हे सर्व पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील. दुपारी 12 वाजता पालखी सोहळा बोंडले येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने माउलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन तोफांची सलामी दिली. येथे माउलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली.
Wednesday, July 10, 2019 AT 08:53 PM (IST)
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेऊन लढतील, असेच दिसून येते.
Wednesday, July 10, 2019 AT 08:34 PM (IST)
1 2 3
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: