Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 2
5पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. पुरामुळे सांगलीत 19, कोल्हापुरात 6, सातारा-पुण्यात प्रत्येकी 7 आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि सातार्‍यात प्रत्येकी एक अशा तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये आज 5 मृतदेह सापडल्याचे दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. कोल्हापुरात 2 लाख 45 हजार 229 जणांचे तर सांगलीत 4 लाख 41 हजार 845 जणांचे स्थलांतर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी 56 फुटांवरून 53 फुटांवर आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांना रक्कम देताना बँकेकडून धनादेश किंवा बँक पासबुक मागण्यात येणार नाही.
Monday, August 12, 2019 AT 08:56 PM (IST)
5पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) : तुकोबा, तुकोबा असा अखंड जय घोष, टाळ-मृदंगाचा गजर महिला वारकर्‍यांनी धरलेले फुगडीचे फेर, ज्ञानोबा-तुकोबांचा निनादणारा घोष, भगवी पताका खांद्यावर घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वैष्णवांच्या भक्तिकल्लोळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्याने आज (सोमवारी) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हा सोहळा  ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी  देहूनगरी लाखोंच्या संख्येने गजबजून गेली. आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरीये वास ॥ पंढरीची ओढ असणार्‍या हजारो भाविकांचे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून पुण्यनगरी देहूत आगमन झाले होते. पालखी सोहळ्याची, वारीची परंपरा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली. वारीचे हे 334 वे वर्ष. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच वारकर्‍यांची लगबग सुरु होती. पहाटे प्रातर्विधी आटोपून इंद्रायणी नदी घाटावर स्नानविधीसाठी वारकर्‍यांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मुख्य मंदिरातत दर्शनासाठी भाविकांनी दर्शन बारीत रांगा लावल्या होते.
Tuesday, June 25, 2019 AT 08:55 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: