Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 43
राफेल प्रकरणी शरद पवारांच्या वक्तव्यावर आक्षेप 5पणजी, दि. 15 (वृत्तसंस्था) : फ्रान्सबरोबर झालेल्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी कराराशी सहमत नसल्यानेच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी आक्षेप घेतला आहे. राजकीय फायद्यासाठी माझ्या वडिलांच्या नावाने खोटी माहिती पसरवू नका. तुमचे वक्तव्य असंवेदनशील आहे. तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून असे वागणे अपेक्षित नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे. उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांच्या नावे पत्र लिहिले आहे. माझ्या वडिलांच्या नावाने खोटे बोलून राजकीय लाभ उठविण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. तुम्ही असे वागणं बंद करावे, असे आवाहन करतानाच शरद पवार यांच्या विधानामुळे कुटुंब दुखावले गेल्याचे उत्पल यांनी म्हटले आहे. माझे वडील कर्करोगाशी झुंज देत असताना काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या नावाने खोटी माहिती देत राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला माझ्या वडिलांनी उत्तरही दिले होते.
Tuesday, April 16, 2019 AT 09:00 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रियांका गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी काँग्रेसने उमदेवारांची यादी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवार घोषित न करता गूढ कायम ठेवले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यासंबंधी काँग्रेसने कमालीची गुप्तता पाळली आहे. कोणीही भाष्य करण्यास तयार नाही. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही प्रियांका गांधी लोकसभेत प्रवेश करणार का यासंबंधी भाष्य करणे टाळले आहे. ‘वाराणसीच्या जागेसंबंधी जो काही निर्णय होईल तो अंतिम झाल्यानंतर कळवण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबाद आणि वाराणसी या दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाची नेमकी काय परिस्थिती आहे                हे तपासण्यासाठी सर्व्हे केला जात आहे. पक्षाने दोन्ही जागांवर आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
Monday, April 15, 2019 AT 09:01 PM (IST)
5जाबा, दि. 11 (वृत्तसंस्था) : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बालाकोटमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर तब्बल 43 दिवसांनी पाकिस्तानी लष्कराने बुधवारी  आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी नेले. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला, तेथील परिस्थिती पाकिस्तानने पत्रकारांना दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या मदरशाचे हवाई हल्ल्यात नुकसान झाले, तो मदरसा या पत्रकरांना दाखवण्यात आला नाही. उलट पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना जाबा टेकडीवरील दुसर्‍या मदरशात नेण्यात आले. त्यावेळी तिथे 100 ते 150 मुले शिक्षण घेत होती. 26 फेब्रुवारीला भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आपले काहीही नुकसान झाले नाही, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता.
Friday, April 12, 2019 AT 08:32 PM (IST)
‘फुटलेल्या’ गोपनीय कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळले 5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारातील कथित अनियमतेत प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी झटका दिला. संरक्षण मंत्रालयातून ‘फुटलेली’ गोपनीय कागदपत्रे पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीसाठी वापरता येणार नाहीत आणि या कागदपत्रांवर सरकारचा विशेषाधिकार आहे, हा सरकारचा प्राथमिक आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना याच कागदपत्रांच्या आधारे पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका करताना ‘चौकीदार चोर है’ या आरोपाचाही पुनरुच्चार केला तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल न वाचताच पंतप्रधानांवर आरोप करून राहुल गांधींनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
Thursday, April 11, 2019 AT 09:06 PM (IST)
मतदानपूर्व जनमत चाचण्यांचा अंदाज 5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिल रोजी होत असून मतदानपूर्व चार जनमत चाचण्यांच्या अंदाजानुसार काठावरचे बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार पुन्हा सत्तेत येईल. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार रालोआला 543 पैकी सरासरी 273 जागा मिळतील, यूपीएला 115 ते 149 तर अन्य पक्षांना 115 ते 160 जागा मिळतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपप्रणीत रालोआला तब्बल 330 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. गेल्या तीन दशकांमधील एवढे प्रचंड बहुमत प्रथमच एका आघाडीला मिळाले होते. त्या तुलनेत यंदा रालोआच्या जागा कमी होतील. मात्र, रालोआ काठावरचे बहुमत मिळवून सत्ता कायम राखेल, असा अंदाज या जनमत चाचण्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे. चार सर्वेक्षणांच्या अंदाजानुसार रालोआला कमीत कमी 263 आणि जास्तीत जास्त 283 जागा मिळू शकतील. त्यात एकट्या भाजपला 228 जागांपर्यंत मजल मारता येईल. भाजपच्या 54 जागा घटणार आहेत, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
Wednesday, April 10, 2019 AT 09:06 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: