Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 19
5थिम्पू, दि. 18 (वृत्तसंस्था) :  भूतान दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रॉयल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना संबोधित केले. एकमेकांमध्ये उत्तम ताळमेळ असलेले भारत-भूतानसारखे शेजारी देश जगात कुठेच नाहीत, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. सध्याच्या घडीला भारतीय विद्यापीठांमध्ये भूतानचे चार हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा वाढला पाहिजे, असेही ते म्हणाले. जगातील सर्वात आनंदी देश अशी भूतानची ओळख आहे. भूतानने सामंजस्य, करुणा आणि एकतेची भावना जपली आहे. भूतानमधील विकास आणि पर्यावरण यांचा एकमेकांना अजिबात अडथळा नाही, असेही मोदी म्हणाले. यावेळी भूतानच्या विद्यार्थ्यांचे मोदींनी कौतुक केले. तुमच्या येथे येऊन खूपच चांगले वाटले. रविवार आहे आणि एका लेक्चरसाठी यावे लागले असे तुम्हाला वाटले असेल, पण येथील निसर्गसौंदर्य आणि लोकांचा साधेपणा प्रत्येकालाच मोहून टाकतो, असे मोदी म्हणाले. भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर इतिहास, सांस्कृतिक परंपरा आदींमध्ये भारत-भूतानमधील संबंध घनिष्ठ आहेत. या ठिकाणी गौतम बुद्ध आले. येथूनच बौद्ध धर्माचा प्रकाश जगभरात पोहोचवला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
Monday, August 19, 2019 AT 08:41 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) ः भारताने पाकिस्तानवर पलटवार करताना पाकिस्तानच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून बंद करण्यात आलेली समझोता एक्स्प्रेसनंतर भारताने दिल्ली-लाहोर बससेवा सोमवारी रद्द केली. दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) ने आज याची माहिती दिली. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळणारे कलम 370 भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आगपाखड करत भारताच्या या निर्णयाच्या विरोधात समझोता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरुवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा चालक आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी ‘धार एक्स्प्रेस’ सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. पाकिस्तानने गुरुवारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा देखील निर्णय घेतला.
Tuesday, August 13, 2019 AT 08:45 PM (IST)
5नवी  दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्षाने हंगामी अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांचीच निवड केल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री गांधी यांच्या निवडीची घोषणा करताच भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. सात सेकंदांच्या या व्हिडिओत काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. एका हिंदी चित्रपटातल्या दृश्याचा हा व्हिडिओ आहे. या ट्विटवर मालवीय यांनी ‘काँग्रेससाठी प्रेमपूर्वक...’ असे म्हटले आहे.
Monday, August 12, 2019 AT 08:35 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. या प्रकरणी पाकिस्तानने अन्य देशांच्या मदतीचीही मागणी केली होती. परंतु पाकिस्तान एकाकी पडला होता. तसेच पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये हे प्रकरण नेले होते. परंतु संयुक्त राष्ट्रानेही पाकिस्तानच्या मध्यस्थीची मागणी नाकारली आहे. यावेळी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँतोनियो गुतारेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1972 मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने गुतारेस यांच्या मध्यस्थीची मागणी पाकिस्तानने केली होती. त्यानंतर गुतारेस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. जम्मू-काश्मीरमधील स्थितीकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणी संयम ठेवण्याचीही आवश्यकता आहे. त्यांनी यावेळी भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1972 मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर संयुक्त राष्ट्रानुसार शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढला जाईल, असे नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे.
Saturday, August 10, 2019 AT 08:59 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांची नावे सुचवली आहेत. या दोन तरूण नेत्यांपैकी एकाला अध्यक्ष करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे सुचवतानाच मिलिंद देवरा यांनी पक्षाचा भावी अध्यक्ष तरूण, अनुभवी व प्रशासकीय अनुभव असलेला असावा या पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मताशी सहमतीही दर्शवली आहे. मला वाटते पायलट आणि ज्योतिरादित्य या दोघांमध्ये या सार्‍या गुणवत्ता आहेत. संघटनेत ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करू शकतील तसेच हे दोघे विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळीही भरून काढतील, असे देवरा यांनी एका वृत्त  संस्थेशी बोलताना सांगितले.
Monday, August 05, 2019 AT 08:55 PM (IST)
1 2 3 4
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: