Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 8
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन तलाकवरून विरोधकांवर टीकस्त्र सोडले. राजकीय फायद्यासाठी आणि मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेसने तीन तलाक रद्द करण्यास विरोध केला. तीन तलाक प्रथा बंद केल्याने मुस्लीम महिलांना त्यांचा हक्कच मिळाला, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मोदींनी तुष्टीकरणाचे राजकारण संपवले. 16 इस्लामिक देशांनी 1922 ते 1963 पर्यंत वेगवेगळ्या वेळी या कुप्रथेवर बंदी आणली व ती हटवली. मात्र, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या कुप्रथेस आपल्या देशातून हटवण्यासाठी 56 वर्षे लागली. तीन तलाक रद्द करणे जर इस्लाम विरोधी असेल तर मग इस्लामी राष्ट्रांनी हा निर्णय का घेतला? या निर्णयाचा फायदा केवळ मुस्लीम महिलांनाच होणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करण्यात आले. या व्होट बँक पॉलिटिक्सला संपवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, की इस्लाम व कुराणनुसार तिहेरी तलाक वैध नाही. त्यामुळे तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली. त्यानंतर कायदा संमत करून मोदी सरकारने या वाईट कुप्रथेचा कायमस्वरूपी शेवट केला.
Monday, August 19, 2019 AT 08:42 PM (IST)
5नवी  दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना देश-विदेशात अडकलेल्या लोकांची तातडीने मदत केली. लोकांच्या संकटात त्या उभ्या राहिल्या. त्यांनी ‘प्रोटोकॉल’शी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याची परिभाषा बदलत ‘प्रोटोकॉल’चं ‘पिपल्स कॉल’मध्ये रूपांतर केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. स्वराज यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांच्यापाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ट्विटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत त्याचाही निपटारा केला, असे मोदी म्हणाले. त्यांना जे खातं मिळालं, त्या खात्याची कार्यसंस्कृती त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली. परराष्ट्र मंत्रालयाचा नेहमीच प्रोटोकॉलशी संबंध जोडला जातो.
Wednesday, August 14, 2019 AT 08:49 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : काश्मीर प्रश्‍नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणतीच चर्चा झाली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वृत्ताचे खंडन केले. यावेळी काँग्रेस खासदारांनी मात्र राजनाथ सिंह यांच्या बोलण्यापूर्वीच सभागृहाचा त्याग करत वॉकआऊट केले होते. काश्मीर प्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असे खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी केले होते. भारताने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. काश्मीर प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. काश्मीर प्रश्‍नावर मध्यस्थता स्वीकारण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. काश्मीर आमच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्‍न असल्याने मध्यस्थता स्वीकारूच शकत नाही.
Thursday, July 25, 2019 AT 08:33 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-2’चे भारताने सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलव्ही एमके3-एम1 प्रक्षेपकाने चांद्रयान-2 ला पृथ्वीच्या कक्षेत सोडले. पुढील 48 दिवस भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील म्हणजेच इस्रोमधील वैज्ञानिक चांद्रयान-2 यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याकडे लक्ष ठेऊन असतील. 7 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जगभरात चांद्रयान-2 मोहिमेची चर्चा असली तरी इस्रोमध्ये आणखी एका मोठ्या मोहिमेची तयारी करण्यात येत आहे. ही मोहीम आहे सूर्यावर यान पाठवण्याची. ‘चांद्रयान-2’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बोलताना इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी इस्रोच्या भविष्यातील मोहिमांसंदर्भात काम सुरू करणार असल्याची माहिती दिली. ‘आम्ही आजच (सोमवारी) पुढील ‘कार्टोसॅट-3’ या मोहिमेबद्दल चर्चा करण्या संदर्भातील माहिती घेतली आहे. या वर्षी आम्ही कार्टोसॅटच्या अनेक मोहिमा राबवणार आहोत, असे सिवान यांनी सांगितले.
Wednesday, July 24, 2019 AT 08:57 PM (IST)
5लाहोर, दि. 19 (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आपली चूक सुधारण्यास मजबूर झालेला पाकिस्तान आता स्वतःला एक जबाबदार देश म्हणत आहे. आयसीजेने भारताच्या बाजूने निकाल दिल्याच्या 24 तासांनंतरच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी रात्री उशिरा एक निवेदन प्रसिद्ध करून आम्ही आमच्या देशाच्या कायद्यानुसार भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळवून देऊ. यासाठी कार्यप्रणालीवर काम सुरू असल्याचे नमूद केले आहे. सलग 16 वेळा पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्यास भारताला नकार दिला होता. अखेर भारत आयसीजेमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानला सगळ्या जगासमोर तोंडावर पडावे लागले.  कुलभूषण जाधव यांना व्हिएन्ना करारानुसार त्यांच्या अधिकारांची माहिती करून देण्यात आली आहे. तसेच एक जबाबदार देशाच्या नात्याने पाकिस्तानी कायद्याप्रमाणे आणि व्हिएन्ना कराराला बांधील राहून आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत कुलभूषण जाधव यांना मिळवून देऊ. ही मदत कशी मिळवून द्यायची यासाठीचे नियोजन केले जात असल्याचे पाकिस्तानी मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
Saturday, July 20, 2019 AT 08:55 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: